mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! हार्ट पेशंट असलेल्या फलंदाजाचा मैदानावर हृदयविकाराने मृत्यू; अखेरच्या सामन्यात खेचले दोन षटकार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 31, 2024
in आरोग्य, राज्य
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

टीम मंगळवेढा टाईम्स। 

क्रिकेट खेळताना किंवा व्यायाम करत असताना तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेकदा अशाप्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत.

आताही जालना जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जालना शहरात आयोजित क्रिकेट स्पर्धेत एका फलंदाजाचा खेळत असताना क्रिझवरच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

३२ वर्षीय खेळाडू जागीच कोसळल्याचे सदर व्हिडीओमध्ये दिसत असून तरुणांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील फ्रेजर बॉईजच्या मैदानावर ख्रिसमस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय पटेल बॅटिंग करत होता. त्याने सिक्सर मारल्यानंतर मधल्या वेळात तो सहकारी फलदांज अजय कसबेशी बातचीत करत होता. तेवढ्यात तो जमिनीवर कोसळला. यावेळी त्याला पाहण्यासाठी इतर खेळाडूंनी धाव घेतल्याचे दिसून येते.

सहकारी फलंदाजाने काय सांगितले?

विजय पटेलचा सहकारी खेळाडू अजय कसबेने एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, आम्ही दोघे बॅटिंग करत होतो. पटेलने सिक्सर मारल्यानंतर मी क्रिझवर चालत जाऊन त्याचे अभिनंदन केले. त्यानंतर तो पुन्हा एकदा बॅटिंगसाठी वळला आणि मी नॉन स्ट्राईक एंडकडे गेलो. पण तेवढ्यात मला पंचाने सांगितले की, तुझा सहकारी मैदानावर पडला आहे. मीही वळून त्याच्याकडे धावत गेलो. आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पूर्वी हृदयविकाराचा झटका साधारणतः वयाची साठी उलटल्यानंतर यायचा; मात्र आता अगदी तरुण वयातही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकाराचे (Cardiovascular diseases) प्रमाण भारतात १९९० मध्ये २५.७ दशलक्ष होते, जे २०२३ मध्ये ६४ दशलक्षांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, जगभरातील हृदयविकाराच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक-पंचमांश मृत्यू भारतात होतात, विशेषत: तरुणांचे. अमेरिकेतही हृदयविकाराचा झटका आलेल्या पाचपैकी एक रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्याची नोंद आहे.

हृदयविकारासाठी वाढता तणाव आणि बदलत्या जीवनशैली या बाबींना जरी कारणीभूत ठरवले गेले असले तरी अनेकांना अपचनासारख्या इतरही काही समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येत असल्याचे सांगितले जाते.

कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याची संभाव्य कारणे काय?

हृदयविकाराचा झटका येण्यामागे अनेक कारणे आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, अनेक तरुण-तरुणी किंवा निरोगी लोक त्यांचे कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब नियमितपणे तपासत नाहीत आणि त्यामुळे असे धोके वाढतात. बैठी जीवनशैली, वाढता लठ्ठपणा आणि आयुष्यातील वाढता ताण ही तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याची अतिरिक्त कारणे असू शकतात. फास्ट फूड, जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेयेदेखील या समस्येला कारणीभूत ठरतात.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: क्रिकेट खेळताना मृत्यू

संबंधित बातम्या

चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
Next Post
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! BTS चं वेड, तीन शाळकरी मुलींनी कोरियाला जाण्यासाठी रचला बनाव; कांड ऐकून व्हाल हैराण

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा