टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या 58 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना
मंगळवेढा शहरप्रमुख प्रतिक अरुण किल्लेदार यांच्यावतीने मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील त्या दिवशी जन्माला येणारे मुलींच्या नावे 5858 रुपये फिक्स डिपॉझिट प्रमाण पत्र मुलींच्या आईकडे देण्यात आले.
याप्रसंगी सौ.पूजा सुनील चव्हाण, सौ.श्वेताली संग्रामसिंह बाबर, सौ.कोमल विकास मोरे, सौ.महानंदा शंकर माने, सौ.पल्लवी ओंकार महामुनी या लाभार्थ्यांना फिक्स डिपॉझिट प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय बुरुकुल, डॉ. अकबर मुलानी, डॉ.पुष्पांजली शिंदे, डॉ. रिहाना मुलानी, डॉ. रवींद्र नाईकवाडी, उद्योजक दिग्विजयसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य अमित गवळी, गणेश मेहकर, अभिजित मोरे आदीजन उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज