मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
तिसंगी, शिरगाव (ता. पंढरपूर) ग्रामपंचायत हद्दीतील घरजागेची बनावट कागदपत्र तयार करत संगनमताने सात ग्राहकांना ५३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वाटप केल्याप्रकरणी

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापक अभिजित बनसोडे यांच्यासह चार कर्मचारी, सात कर्जदार व ८ जामीनदार, अशा २० जणांवर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
बँकेचे एरिया मॅनेजर उमाकांत देशमाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०२० ते २०२५ दरम्यान हा गुन्हा घडल्याचे म्हटले आहे.

पंढरपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंक रोड येथील शाखेचे व्यवस्थापक अभिजीत ग्यानबा बनसोडे, कर्मचारी महेश बबन शेंडेकर (रा. वडदेगाव, ता. मोहोळ), सोमनाथ प्रकाश भोसले (रा. पापरी, ता. मोहोळ),

महादेव किसन खटकाळे (रा. अकोला, ता.सांगोला), अमोल देवेंद्र नादरगी (रा. विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर) यांनी पंढरपूर तालुक्यातील सात शेतकऱ्यांना ५३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज दिले होते.
कर्ज देताना घेतलेल्या कागदपत्रांची छाननी व पडताळणी न करता संगनमत करत बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोप ठेवला आहे.
कायदेशीर अहवाल मिळाल्यानंतर बँकेने प्रकरण मंजूर करुन कर्ज वितरीत करण्याची कार्यपद्धती आहे.

मात्र, सदर बँकेचे व्यवस्थापक व चार कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी संगनमत करत बनावट कागदपत्र तयार करुन खोट्या उताऱ्यावर मालक असल्याचे दर्शवत ग्रामसेवकांच्या खोट्या सह्या व शिक्के असलेल्या बनावट कागदपत्रांवर कर्ज दिले.

यात बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली. व्यवस्थापक बनसोडे याला अटक केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











