मंगळवेढा टाईम्स न्युज।
रड्डे पंचायत समिती गण हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला असून भाजपकडून प्रबळ उमेदवार आकाश डांगे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चाचपणी सुरू असून डांगे यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील रड्डे पंचायत समिती गणातून भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी रड्डे गावातील युवा नेते बालाजी सुपनर यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे केली आहे.

यावेळी बोलताना सुपनर म्हणाले, रेड्डे गाव व परिसरातील दक्षिण भाग आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे.

अशा ठिकाणी आकाश डांगेसारखा निष्ठावंत, जातपात न पाहणारा कार्यकर्ता जर निवडून आला, तर गेल्या २० वर्षांचा आमचा संघर्ष संपेल.

आकाश डांगे यांचे सामाजिक व राजकीय योगदान अधोरेखित करताना त्यांनी पुढे सांगितले की, दूध दरासाठी त्यांनी रक्ताने पत्र लिहिले होते.

कोरोना काळात ज्या वेळेस लोकांनी आपल्या नातेवाइकांपासूनही तोंड वळवलं, त्या वेळेस आकाश डांगे यांनी गावातील अनेक कोरोना रुग्णांना मदत केली, अनेकांचे अंतिम संस्कारही स्वतः पुढाकार घेऊन केले. अशा प्रकारचे नेतृत्व संपूर्ण तालुक्यात दुर्मीळ आहे.

सुपनर पुढे म्हणाले, ज्यांना कलेक्टर ऑफिस कुठे आहे हेही माहीत नाही, अशांना उमेदवारी देण्यात काहीही अर्थ नाही. मंत्रालयात जावून आ. समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली

लोकांचे प्रश्न सोडविणारे, लोकांची कामे धडाक्यात करणारे नेतृत्व म्हणजे आकाश डांगे. आमदार आवताडे यांनी जर अशा कार्यक्षम व विश्वासू तरुणाला संधी दिली, तर आम्ही जीव तोडून काम करून त्यांना विजय मिळवून देऊ.

तसेच, रड्डे गावासह परिसरातील इतर गावांतील सरपंच व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचेही सुपनर यांनी स्पष्ट केले. शेवटी निर्णय आ.आवताडे असला, तरी आमच्या मागणीचा त्यांनी शंभर टक्के विचार करावा, अशी भावनिक विनंतीही त्यांनी केली.
रड्डे गणाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर आकाश डांगे यांच्याशिवाय दुसरा योग्य उमेदवार नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












