टीम मंगळवेढा टाईम्स ।
बांधकाम क्षेत्रातील प्रगतीला नवा वेग देण्यासाठी आणि दर्जेदार साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झालेल्या ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ या नूतन फर्मचा भव्य उद्घाटन समारंभ आज होणार आहे.

मंगळवेढा आणि परिसरातील वाढते नागरीकरण आणि बांधकाम क्षेत्राची गरज लक्षात घेऊन, ग्राहकांना उच्च दर्जाचे बांधकाम साहित्य रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झालेल्या सांगोला नाका येथे ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून नागरिकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे.

या नूतन व्यवसायाचे उद्घाटन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान (दादा) आवताडे यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

एकाच ठिकाणी सर्व सोयी
श्री. तात्यासाहेब पंडू जाधव, श्री. सागर मनोज जाधव आणि श्री. विक्रांत मनोज जाधव यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या फर्ममध्ये घर किंवा व्यावसायिक इमारत बांधण्यासाठी लागणारे सर्व प्राथमिक व दुय्यम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या फर्ममुळे मंगळवेढा आणि परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना तसेच घरमालकांना उच्च दर्जाचे मटेरियल रास्त दरात उपलब्ध होणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने सिमेंट (विविध ब्रँड्स), स्टील, खडी, वाळू (कृत्रिम आणि नैसर्गिक), विटा, पेव्हर ब्लॉक्स आणि इतर आवश्यक मटेरिअलचा समावेश आहे.

ग्राहकांचा विश्वास हेच ध्येय
“मंगळवेढ्यातील ग्राहकांना दर्जेदार साहित्य मिळवण्यासाठी दूरवर जावे लागू नये, आणि त्यांना वाजवी दरात सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळाव्यात, हा आमचा मुख्य उद्देश आहे.

वेळेवर डिलिव्हरी आणि पारदर्शक व्यवहार यावर आमचा भर राहील,” असे फर्मचे संचालक तात्यासाहेब जाधव व सागर जाधव यांनी सांगितले.

या उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, बांधकाम व्यावसायिक, इंजिनिअर्स आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या नवीन उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.
पत्ता आणि संपर्क:
श्री बालाजी कॉम्प्लेक्स, सांगोला नाका, डोंगरगांव रोड, मंगळवेढा.
संपर्क: ७३५०६६०४५६ | ८६९८३११०४७

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.




बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










