टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील आरोपी समाधान खांडेकर याची पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री.तोष्णीवाल यांनी जामीनावर मुक्तता केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी ४ वा. चे सुमारास मयत सुरेखा दत्ता हांडे हिने तीचा प्रियकर समाधान गोपीनाथ खांडेकर रा.गोणेवाडी, ता. मंगळवेढा यांनी “तु तुझ्या घरी जा,
तु आता माझ्यासोबत राहू नको” असे म्हणून वारंवार मारहाण करुन त्रास देवून तिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने मारुती आप्पा खांडेकर यांचे शेतातील विहीरीमध्ये आत्महत्या करुन घेतली आहे.
म्हणून मयताचा भाउ म्हाळाप्पा अर्जुन सलगरे यांनी मयताचा प्रियकर समाधान गोपीनाथ खांडेकर रा.गोणेवाडी यांचेविरुद्ध मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे भा.द.वी. १८६० चे कलम ३०६, ३२३ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती.
सदर प्रकरणातील मयत सुरेखा हिने यातील आरोपीविरुद्ध कोणत्याही पोलीस स्टेशन अगर न्यायालयामध्ये तक्रार दाखल केलेली नाही अथवा सदर मयत व्यक्तीने आत्महत्या करण्यासंदर्भात कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही
अथवा या आरोपीविरुद्ध कोणाजवळही कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही. तसेच मयत सुरेखा हिचे दत्ता हांडे याचेबरोबर विवाह झालेला असला तरी दोघांचे एकमेकांसोबत पटत नव्हते
तसेच त्याचेबरोबर ती सुखी नव्हती त्यामुळे ती यातील आरोपीकडे येवून राहिली होती त्यामुळे मयताचा पती किंवा भाउ यांच्या त्रासापोटी आत्महत्या केल्याची शक्यता आहे असा केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. तोष्णीवाल यांनी जामीनावर मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणी यातील आरोपीतर्फे अॅड. एम.डी.गायकवाड यांनी काम पाहिले व सरकार तर्फे अॅड.वांगीकर यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज