mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गुरु-शिष्यांची भेट! हुलजंतीत महालिंगराया व बिरोबा भेटीचा पालखी सोहळा ‘या’ तारखेला होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 10, 2023
in मंगळवेढा
बिरोबा-महालिंगराया गुरु शिष्याची आज हुलजंतीत भेट, लाखो भक्त दाखल; भाविकांच्या माहितीसाठी यात्राशेड उभा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील जागृत, श्री हालमत संप्रदायातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून हुलजंती (ता. मंगळवेढा) महालिंगरायाची सर्वदूर ख्याती आहे. बिरोबा व महालिंगराया यांचा भेट सोहळा हा प्रसिद्ध आहे.हा भक्तीमय सोहळा ४ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे.

या भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंडास (ध्वज) हा सोहळा रविवारी होणार आहे. तर मुख्य दिवशी सोमवारी (दि.१३ रोजी) हून्नूरचा श्री बिरोबा व श्री महालिंगराया या गुरु-शिष्यांच्या भेटीचा पालखी सोहळा होणार आहे.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्र-आंध्रप्रदेश, कर्नाटकातील लाखोच्या संख्येने भक्तगण येतात. हा दिव्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ असा लाखों भक्तगण अनुभवणार आहे. महालिंगरायाला मुख्य दिवशी नैवेद्याचा मान जतच्या डफळे संस्थानिकांचा असतो.

नुकतीच पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरुदेवाची यात्रा पार पडली आहे. त्यानंतर हा भेट सोहळा लगेचच पार पाडत असतो.

बिरोबा व महालिंगराया, या गुरु-शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा दिपावाली पाडव्याच्या पूर्वसंध्येला (दि.१३ सोमवार) रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे.

या सोहळ्याच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता मुंडास बांधले जाते. मध्यान रात्री कैलासमधून शंकर-पार्वती येतात अन् महालिंगराया मंदिराच्या पंच शिखराला (मुंडास) आहेर करतात.

यावेळी देवाची मुक भाकणूक झाली असेही मानतात. आशी धारणा भक्तांची पूर्वीपासून आहे. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. तदनंतर दुसऱ्या दिवशी गुरु-शिष्यांच्या पालखी भेटीचा सोहळा देवस्थानच्या बाजूने वाहत असलेल्या हालहाळ ओढ्यात होणार आहे.

गुरुशिष्यांची पालखी भेट झाल्यानंतर नगारा व ढोल कैताळ वाजवीत, अनेक पालख्या महालिंगराया पालखीची भेट घेतात. यावेळी ‘महालिंगराया-बिरोबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात होते. नगारा व ढोल यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून जातो.

हा पालखी भेट सोहळा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व गोवा राज्यातून दाखल झालेल्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. या गुरू शिष्याच्या नयनरम्य भेट सोहळ्या अगोदर सात पालख्यांचा भेटीचा मान आहे. सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव, शिरडोन येथील शिलवती , बिरोबा यासह अन्य देवाच्या पालख्यांचा भेट सोहळा होत आहे. हा भक्तिमय सोहळा आठवडाभर सुरू असतो.

महालिंगराया या वीर (सिद्ध)पुरुषाने बारामती येथे मासाळ घराण्यात जन्म घेतला. महालिंगरायानी अनेक भक्तांच्या लीलया चमत्कार करून दाखवले. दुष्टांवर प्रहार, संहार केला. सज्जनांचे रक्षण केले. समाज जागृती केली.

गुरु बिरोबा यांना गुरुस्थानी ठेवून सेवा कशी करावी, हे महालिंगरायानी आपल्या भक्तीतून दाखवून दिले आहे. मंगळवेढापासून दक्षिणेला २२ किलोमीटर अंतरावर हुलजंती (दक्षिण काशी )म्हणून ओळखले जाते. या मंदिरासमोरूनच मंगळवेढा उमदी विजापूर राष्ट्रीय महामार्ग जातो यामुळे प्रवासांची चांगली सोय झाली आहे.

या गावास धार्मिक महत्त्व देवस्थानांमुळे प्राप्त झाले आहे. बाराव्या शतकातील दगडी व कोरीव आकर्षक मंदिर बांधकाम आहे. स्वागत कमानीचे काम पूर्णत्वास येत आहे. सहाजिकच या ठिकाणी गेल्यावर थोडा वेळ थांबल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

हुलजंती – महालिंगराया व जत धार्मिक संबंध

महालिंगराया हुलजंती येथील मुख्य यात्रेच्या दिवशी देवाच्या नैवेद्याचा मान जत येथील डफळे संस्थानिक राजघराण्याला आहे. तो आज ही पूर्वापार पारंपारिक पद्धतीने जपला जात आहे. महालिंगरायाचे गुरु बिरोबा देव हन्नूर (मंगळवेढा) येथील असून पूर्वी हे गाव जतच्या डफळे संस्थानिकात होते.

आज ही दोन्ही देवस्थान या ठिकाणी डफळे संस्थानिकातील राजेंना मान दिला जातो. हन्नुर हे जत तालुक्यातील उमदीपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर देवस्थान आहे. जत तालुक्यातील उटगी येथील भरमदेव, सोन्याळ येथील विठुराया या देवांच्या पालख्या या भेटी सोहळ्यासाठी मानाच्या असतात. त्यामुळे धार्मिक संबंध मोठ्या प्रमाणात आजही जोपासले जात आहे.

हालमत धर्मांची” काशी (भू कैलास)

महालिंगरायाने शिगीमठ (शिरडोण) येथे आपल्या गुरुचे मठही स्थापन केला. त्या मठात श्री महालिंगरायानी अनंतकाळ गुरुची भक्ती केली. त्याच काळात त्यानी लिंबाळ डोंगरातील वाघिणीचे दूध स्वतःहुन काढून आणून गुरूस अर्पण केले होते. त्या वाघिणीच्या स्मरणार्थ जिंती नारायणपुर या गावाला “हुलजंती” असे नांव महालिंगरायाने ठेवले. हुलीजयंती या नावावरुनच पुढे हुलजंती हे नांव प्रचारात आले. तेच सध्याचे “हालमत धर्मांचे” काशी होय. तसेच हुलजंतीला भू कैलास असे म्हणतात, अशी आख्यायिका आहे…..

यंदाचा नयनरम्य पालखी भेट सोहळा

शनिवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी हून्नूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री बिरोबा व महालिंगराया पालखी भेट संपन्न.
शनिवारी दि.११ नोव्हेंबर रोजी शिरढोण बिरोबा शिलवंती भेट.
रविवारी दि.१२ नोव्हेंबर रोजी मडी जकराया भेट.. रविवारी दि.१२ नोव्हेंबर रोजी मुंडास (ध्वज).
सोमवार दि. १३ नोव्हेंबर रोजी हुलजंती महालिंगराया व बिरोबा यांची पालखी भेट सोहळा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: हुलजंती

संबंधित बातम्या

अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांची बदली; त्यांच्या जागी तहसीलदार प्रदीप शेलार यांची नियुक्ती

July 1, 2025
मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

June 29, 2025

खळबळ! महाविदयालयात परीक्षेस आलेली १९ वर्षीय मुलगी मंगळवेढ्यातून बेपत्ता; ‘या’ वर्णणाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधा

June 28, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

June 26, 2025
नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
मंगळवेढा तहसील कार्यालयात आज जिजाऊ-सावित्रींच्या लेकी आणि वीर पत्नींचा सत्कार सोहळा

मंगळवेढेकरांनो! आपल्या उत्पन्नात वाढ झाली असल्यास ‘या’ मोफत योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडा; महसूल प्रशासनाने केले आवाहन

June 23, 2025
Next Post
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

मोठी बातमी! आतापर्यंतचा मनोज जरांगेंचं सर्वात मोठं वक्तव्य; शिक्षण, नोकऱ्यांसह राजकीय आरक्षण सुद्धा घेणार?

ताज्या बातम्या

खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार; व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध; उत्सवाच्या दिवशी ‘येथून’ मिळणार प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

July 1, 2025
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

सोलापूर जिल्ह्यात ‘एवढे’ रेशन दुकानांचा जाहीरनामा; महिला बचत गट, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांना दुकाने प्राधान्याने दिली जाणार; इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत अर्ज करावा

July 1, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांची बदली; त्यांच्या जागी तहसीलदार प्रदीप शेलार यांची नियुक्ती

July 1, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणासाठी ‘या’ महिन्यात मुंबई गाठणार, ३ कोटी मराठा बांधव मोर्चाला जाणार; आंदोलकाला धक्का लागला तर…; मनोज जरांगे पाटीलांनी सांगितला ‘बी प्लॅन’

June 30, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

संतापजनक! चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने बापाने केला साडीने गळा आवळून चिमुरडीचा खून; मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर बाप अटकेत

June 30, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा