टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने विनयभंग करून कू कर्म करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रूर बापाच्या विरोधात पिडीत मुलीच्या आईनेच फिर्याद दाखल केली आहे.
ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी आरोपी कू कर्म करणाऱ्या जन्मदात्या बापाविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.
बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी हा 2018 मधील मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून स्वतःच्या अल्पवयीन मुलीकडे वाईट हेतूच्या नजरेने पाहून तीला दमदाटी व शिविगाळ करून तीचा वेळोवेळी विनयभंग करत होता.
दि.3 फेब्रुवारी रोजी असाच हिडीस प्रकार स्वतःच्या मुलीसोबत करत असल्याचे पिडीत मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेवून आरोपी विरोधात फिर्याद दिली.
या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अलीकडेच पंढरपूर तालुक्यात चाॅकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
त्यानंतर आता स्वतःच्या बापाचे कू कर्म समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज