mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

निर्बंध उठणार! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्‍यातून कोरोना हद्दपार; याचे पालन करावेच लागणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 24, 2022
in सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सध्या कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे आटोक्‍यात आली असून सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे अवघे दहा सक्रिय रुग्ण आहेत.

मंगळवेढा, बार्शी, करमाळा, माळशिरस, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत.

कोरोनाच्या दोन्ही लाटेत प्रशासनाची चिंता वाढविलेला कोरोना आता परतीच्या वाटेवर आहे.

कडक लॉकडाउन आणि पुन्हा कडक निर्बंध लागू केल्यानंतर कोविशिल्ड व कोवॅक्‍सिन या प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाला वेळीच रोखण्यात यश मिळाले.

राज्यातील जवळपास आठ कोटी व्यक्‍तींनी प्रतिबंधित लस टोचली असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील 30 लाख व्यक्‍तींचा समावेश आहे.

कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये माळशिरस, बार्शी, पंढरपूर या तीन तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यानंतर सर्वच तालुक्‍यासह सोलापूर शहराचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक राहिला.

प्रतिबंधित क्षेत्र आणि दंडात्मक कारवाईमुळे लोकांनी नियमांचे पालन करायला सुरवात केली. शिक्षकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला. त्याचाही मोठा लाभ कोरोनाला रोखण्यासाठी झाला.

आता हा कोरोना परतीच्या वाटेवर असून अक्‍कलकोट, माढा, पंढरपूर या तालुक्‍यात प्रत्येकी एक तर सांगोल्यात दोन आणि मोहोळ तालुक्‍यात सर्वाधिक तीन सक्रिय रुग्ण आहेत.

तरीही नियम पाळा

चौथी लाट नाहीच, तरीही नियम पाळा
जगातील काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. आपल्याकडे कोरोनाची चौथी लाट येईल, अशी भीती आहे.

पालन करावेच लागेल

पण, तुर्तास तशी कोणतीही शक्‍यता नाही. तरीही, नागरिकांनी आणखी काही दिवस मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागेल.

दुसरीकडे 12 वर्षांवरील सर्वांनीच कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.(स्रोत; सकाळ)

ग्रामीणमधील कोरोनाची स्थिती

एकूण बाधित –
1 लाख 86 हजार 036, कोरोनामुळे मृत्यू – 3 हजार 726, कोरोनामुक्‍त रुग्ण – 1 लाख 82 हजार 302, सक्रिय रुग्ण – 8

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना आढावा

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सदस्यांची जात वैधता पडताळणी होणार; सदस्यांची यादी मागितली

February 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

​सासूचा जीव घ्यायला निघाली, कुंकूच पुसलं गेलं! विषप्रयोग फसला, नराधम पत्नीचा सुसंस्कृत चेहरा बेनकाब; पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post
महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

मराठा समाजाच्या सोयीसवलती बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानपरिषदेत निवेदन; 'या' उमेदवारांना सेवेत सामावून घेणार

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा