टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि नेते कामाला लागले आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
माढा विधानसभा मतदार संघात ही या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दंड थोपटले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत माढ्यात मीच आमदारकीची दहीहंडी फोडणार असं म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) आमदार बबनराव शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे.
गेल्या महिन्याभरापासून अभिजीत पाटील यांनी मतदार संघात गाठीभेटी आणि गाव दौरे सुरू केले आहेत. खेळ पैठणीचा, दहीहंडी,कुस्ती स्पर्धा अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मतदार संघात संपर्क दौरे सुरू केले आहेत.
माढ्यात अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची दही हंडी मीच फोडणार असा दावा करत आमदार शिंदे यांना आव्हान दिले आहे.
आमदार बबन शिंदे हे विधानसभा निवडणूक लढवतील की नाही याबाबत साशंकता आहे. त्यांचे सुपुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे हे निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे.
अभिजीत पाटील हे सध्या महायुतीच्या गोठात असले तरी त्यांनी अद्याप कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट केले नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज