मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२३ निमित्त पंढरपुर शहर व परिसरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी पंढरपूर शहर व शहरापासून ५ कि.मी. त्रिज्या परिसरातील
सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने दि. २८ ते ३० जून या कालावधीत पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत.
तसेच, दिनांक १ ते ३ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व शहरापासून ५ कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने सायंकाळी ५.०० वाजेपासून बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम १४२ अन्वये याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
तसेच, आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२३ निमित्त संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी (गावात/शहरात) सार्वजनिक शांतता राखण्याच्या पार्श्वभूमिवर दिनांक २३ जून रोजी नातपुते पूर्ण दिवस बंद,
दिनांक २४ जून रोजी माळशिरस, अकलुज पूर्ण दिवस बंद, दिनांक २५ जून रोजी वेळापूर, बोरगांव, श्रीपूर, माळीनगर पूर्ण दिवस बंद, दिनांक २६ जून रोजी भंडीशेगाव,
पिराची कुरोली पूर्ण दिवस बंद, दिनांक 27 जून रोजी वाखरी पूर्ण दिवस बंद राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज