टीम मंगळवेढा टाईम्स ।
सरपंच व उपसरपंच पद रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती शासन स्तरावर अधिकार प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी या संदर्भात क्रमांक १४ अन्वये करण्यात येते.
त्यानुसार बठाण ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच पद रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालण्याच्या दृष्टीने बी . बी बाबर कृषी अधिकारी यांची ग्रामपंचायतीसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बठाण येथील सरपंच पद नामनिर्देशन न प्राप्त झाल्याने ते रिक्त असल्याने व उपसरपंच पद अविश्वास ठरावाने रिक्त असल्याने सदरचे पद दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी पासून रिक्त झालेले पद
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि कलम ४३ नुसार सरपंच किंवा उपसरपंच पद ३० दिवसाच्या आत भरणे आवश्यक आहे.
परंतु सरपंच व उपसरपंच या पदाची जागा रिकामी झाल्यामुळे व राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा ग्रामपंचायतीस प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याची तरतूद आहे.
त्यानुसार पंचायत समिती येथे कार्यरत अधिकारी प्रशासक म्हणून सरपंच पदाची पुन्हा निवडणूक होईपर्यंत सरपंचाचे सर्व अधिकार बजावत व सर्व जबाबदाऱ्या पार पडतील अशी तरतूद करण्यात आली आहे.
त्यानुसार बी.बी. बाबर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज