टीम मंगळवेढा टाईम्स।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिलांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा होत आहेत. अशातच सातारा जिल्ह्यातुन खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका महिलेने लाडकी बहीणचे 28 अर्ज भरल्याचे समोर आले आहे.
यानंतर तात्काळ सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी बहीण योजने अंतर्गत माहिती घेतली. खटाव तालुक्यातील मायणीच्या एका दाम्पत्याने 28 अर्ज अनधिकृत पद्धतीने अर्ज भरल्याचे आता निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे गुगलवरून वेगवेगळे आधार कार्ड नंबर मिळवून तिच्या बँकेचं खातं लाडकी बहीण योजनेच्या अर्जांना जोडले होते.
गुगल वरून घेतले वेगवेगळे आधार कार्ड नंबर..
मिळालेल्या माहितीनुसार, माहेरचे नाव प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय घाडगे अशी या दाम्पत्याची नावे असून या प्रकरणांमध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे.
याविषयी सातारा जिल्हा प्रशासनाने त्रिसदस्यीय समिती स्थापन करून संबंधित दांपत्याने भरलेल्या अर्जाची पडताळणी केली असता संबंधित महिलेने एकाच नावाने गुगल वरून घेतलेल्या वेगवेगळ्या आधार कार्ड नंबर चा वापर करून माणदेशी महिला बँकेचे खाते अर्जांना संलग्न केले होते.
या पडताळणीत 28 अर्जा पैकी एकाच अर्जाची 3000 रुपये रक्कम संबंधित महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचं समोर आलं आहे.
इतर उरलेल्या कोणत्याही अर्जाचे पैसे बँक खात्यात जमा झालेले नाहीत. या प्रकरणाची जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र या घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज