टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीची १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. बीसीसीआयने शनिवारी या संघाची घोषणा केली आहे.
दि.८ ते १७ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा दुबई येथे होत आहे. ८ डिसेंबरला भारतीय संघाची लढत अफगाणिस्तान विरुद्ध, १० डिसेंबरला पाकिस्तान विरुद्ध तर १२ डिसेंबरला नेपाळ विरुद्ध होणार आहे.
या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाकडून अर्शिनची तुफानी खेळी नक्कीच पाहायला मिळणार आहे. भारतीय संघाकडून आशिया कप स्पर्धा खेळणारा अर्शिन हा सोलापूरचा पहिला खेळाडू ठरला आहे. याबद्दल सोलापूरच्या क्रिकेटप्रेमींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नुकतीच झालेल्या एमपीएल स्पर्धेत अर्शिनने धडाकेबाज शतक झळकावले होते. सोलापूरचे बालरोग तज्ञ डॉ.अतुल कुलकर्णी यांचा अर्शिन कुलकर्णी सुपुत्र आहे.
भारताच्या सीनियर संघात खेळायचे स्वप्न
भारताच्या अंडर १९ मध्ये निवड झाल्याने अतिशय आनंद झाला आहे. लहानपणापासूनच मला क्रिकेटची आवड होती. वयाच्या ६ व्या वर्षांपासून क्रिकेट खेळायला सुरवात केली. सोलापुरात अंडर १४, १७, १९ खेळलो. पुढे महाराष्ट्र प्रीमियर लीग, वीनू माकंड ट्रॉफी, एन केपी साळवे ट्रॉफी, सय्यद अली ट्रॉफीमध्ये निवड होत गेली. आशिया कपसाठी भारताच्या संघात निवड झाली. माझे स्वप्न भारताच्या सीनियर संघात खेळायचे आहे. – अर्शिन कुलकर्णी, क्रिकेटपटू, भारत.
अर्शिनने स्वतः च्या मेहनतीवर हे यश खेचून आणले
अर्शिनची इंडियन क्रिकेट टीममध्ये निवड
झाली अतिशय आनंदी आहोत. कमी वयात मोठे यश मिळविले याचा अभिमान आहे. अर्शिनने स्वतः च्या मेहनतीवर हे यश खेचून आणले आहे.
भरपूर वेळ सराव करायचा परीक्षा असतानाही सराव सोडला नाही. आशिया कपमध्ये त्याने चांगली कामगिरी करावी व देशाचे नाव रोशन करावे आणि भारतीय वरिष्ठ संघात पदार्पण -करावे हीच सदिच्छा आहे. अतुल कुलकर्णी, अर्शिनचे वडील (स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज