टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरानजीक असलेल्या एकमेव औद्योगिक वसाहतीत वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याकडे आणि स्वतंत्र एक्स्प्रेस फिडरच्या मागणीकडे महावितरणने केलेल्या दुर्लक्षामुळे येथील उद्योग व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
नागपूर- रत्नागिरी व टेंभुर्णी विजयपूर या महामार्गामुळे मंगळवेढा शहर औद्योगीकरणाच्या जवळ आले असताना, औद्योगिक सुविधा देण्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. शहरानजीक असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वाधिक क्षेत्र सौरऊर्जा प्रकल्पांनी व्यापले आहे.
सध्या जवळपास शंभरपेक्षा अधिक उद्योजकांनी उद्योग व्यवसायासाठी भूखंड संपादित केले आहे. प्रत्यक्षात मात्र २५ उद्योग सध्या सुरू आहेत. त्यामध्ये सिमेंट उद्योग, दुग्धजन्य पदार्थाचे उद्योग, आइस्क्रीम उद्योग, काजू प्रक्रिया उद्योग, खिळे उद्योग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेशीम उद्योग, कागद उद्योग असे उद्योग कार्यरत असून,
गामध्ये जवळपास ५०० बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले आहे. येथील औद्योगिक प्रकल्पांसाठी पाण्याची टाकी उभी केलो मात्र या टाकीद्वारे अद्याप पाणीपुरवठा होत नाही. शिवाय या ठिकाणचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने उद्योग बंद ठेवावे लागत आहेत.
त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे उत्पादनासाठी केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्नात यात तफावत आल्यामुळे उद्योजक कर्जबाजारी बनत आहेत.
कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून स्वतंत्र फिडरची मागणी करून देखील महावितरणने स्वतंत्र फिडरद्वारे वीजपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे उद्योजकांना उद्योजक ऐवजी कर्जबाजारी उद्योजक म्हणवून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
उद्योजकांच्या मागणीकडे ना शासनाने लक्ष दिले, ना महावितरणने; त्यामुळे भविष्यात नवीन उद्योग उभारण्याची मानसिकता होत नाही.
...त्यामुळे येथील उद्योजक अडचणीत
उद्योग सुरू असताना अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होतो. अधिका-यांना विचारणा केली असता उलट ग्राहकांना धमकावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे येथील उद्योजक अडचणीत आले आहेत. – भोलेनाथ पाटील उद्योजक
खंडित वीजपुरवठ्यामुळे कामगार बसून
२०१८ पासून स्वतंत्र फिडरराद्वारे वीजपुरवठ्याची मागणी करूनही दुर्लक्ष के केले गेले. खंडित वीजपुरवठ्यामुळे कामगार बसून राहात आहेत. त्यामुळे त्यांना त्या वेळेचा पगार द्यावा लागतो. ही बाब महावितरणच्या लक्षात येत नाही. वीज आणि पाणी या मागणीकडे दुर्लक्ष झाले. – सोमनाथ माळी, आध्यक्ष, मंगळवेढा औद्योगिक वसाहत.
ठेकेदाराने काम न केल्याने या कामाचा निधी परत गेला
स्वतंत्र फिडरद्वारे वीजपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने काम न केल्याने या कामाचा निधी परत गेला. सुधारित मान्यतेने एक महिन्यात काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे वरिष्ठांनी कळविले आहे.- सचिन कोळेकर, शाखा अभियंता, महावितरण
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज