टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदूर या भागातील शेतकऱ्यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार , ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे नंदूर येथील उपकेंद्र मंजूर झाले आहे.
त्यासाठी निधीचीदेखील तरतूद झाली असल्याने उभारणीचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन सदस्य भगीरथ भालके यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठी पाणी असूनदेखील शेतकऱ्यांना अपुऱ्या व कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते.
तसेच, बोराळे व मरवडे येथील वीज उपकेंद्रावर भार पडत असल्याने काही भागांत आठ तासांपेक्षा कमी व काहीवेळा अपुरा वीजपुरवठा होत होता.
याची दखल घेऊन वरिष्ठांकडे प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नास यश येऊन नंदूर येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रास मंजुरी मिळाली आहे.
या कामासाठी शासनाने सुमारे साडेतीन कोटींचा निधीदेखील दोन योजनांतून मंजूर केला आहे.
उपकेंद्रामुळे या नवीन होणाऱ्या वीज लक्ष्मीदहिवडीसह लेंडवे चिंचाळे , अकोला व गुंजेगाव येथील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
तसेच, नंदर येथील नव्याने होणाऱ्या वीज उपकेंद्रामुळे डोनज, बालाजीनगर, भालेवाडी, अरली, कात्राळ येथील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज