टीम मंगळवेढा टाईम्स ।
धाडस सामाजिक संघटनेच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आण्णासाहेब विठोबा आसबे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष शरद कोळी यांनी नियुक्तीपत्र देवून घोषित केली आहे.
सदर नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष शरद कोळी, महिला जिल्हाध्यक्षा शितल मोराळे -खटावकर, दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्षा हुआण्णा शेजाळे, दत्तात्रय गायवाले,
विकास पुजारी, सर्जेराव धोत्रे, आकाश जाधव, किरण पाटील, उद्योजक विजय लेंडवे, शहाबाज तांबोळी, आण्णा भंडारे, सारंग कांबळे आदींच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा करणे, शासकीय ऑफिसमध्ये जिथे जनतेची आर्थिक लुट होत आहे अशा ठिकाणी पायबंद घालून संबंधीतांचे काम मार्गी लावणे
हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असून अण्णासाहेब आसबे यांनी हे काम निष्ठेने पार पाडावे अशी अपेक्षा शरद कोळी यांनी व्यक्त केली आहे.
अण्णासाहेब आसबे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन.
गोर-गरिबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माझा पुढाकार असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज