मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यातील दुध संघांनी अचानक दुधाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे दुध उत्पादक अडचणीत आले आहेत. राज्य सरकारने तातडीने गाईच्या दुधाला ४० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये दरवाढ देण्याचा निर्णय घेण्याचे धोरण जाहीर करुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या पूजेला यावे.
दुधाला एफआरपी कायदा लागू करण्यात यावा, ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर दुग्ध व्यवसाय वाढीचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशा मागण्या शिवसेनेच्या वतीने आल्या आहेत. त्या मान्य झाल्या नाहीत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधान भवनावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
दुध दर वाढीची मागणी मान्य झाली नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दुध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे,
पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, गणेश वानकर, अमर पाटील, राज्य विस्तारक शरद कोळी, अतुल भंवर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, विक्रांत काकडे, पुजा खंदारे उपस्थित होते.
या मागण्यासाठी धरला आग्रह
लंम्पी रोग, कोरोनानंतर दुध व्यवसाय उभारी घेत आहे, अशात राज्यातील दूध संघानी अचानक दर कमी केले. एकीकडे पशुखाद्य, पशु वैद्यकीय सेवा दर दुप्पट होत आहेत.
दर कमी करण्याचे उत्तर शासनाने द्यावे. दुध संघ नफेखोरी करत आहेत का, हा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या नंदिनी आणि गुजरातच्या अमुल ब्रॅन्डच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने एक ब्रॅन्ड निर्माण करावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज