टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी आज शनिवारी नगरसेवक पदासाठी 24 अर्ज दाखल झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी आज एकही अर्ज आला नाही. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

मंगळवेढ्यात २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सोमवार दि.१७ नोव्हेंबर अखेर उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असून, २१ नोव्हेंबर अर्ज माघारीची तारीख आहे.

मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीची सुरू झाली आहे. काल शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी राजश्री राजकुमार चेळेकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता. आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आला आहे.

नगरसेवक पदासाठीही अर्ज दाखल करण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीसाठीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

पालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून (10 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. मात्र, आमदार समाधान आवताडे, अनिल सावंत, राहुल शहा, अजित जगताप, समविचारी आघाडी आदी पक्षगटांमध्ये उमेदवारांबाबत अंतिम निर्णय न झाल्याने पहिल्या दोन तीन दिवसांत अर्ज दाखल प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही.
आज नगरसेवक पदासाठी 24 अर्ज दाखल झालेले आहेत.
आज अखेर पर्यंत नगरसेवकपदासाठी 36 तर नगराध्यक्ष पदासाठी 1 असे अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार 17 नोव्हेंबरपर्यंत आहे. उद्या रविवार सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
मात्र, उमेदवारी दाखल करण्यास होणार उशीर लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाने रविवारी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास परवानगी दिलेली आहे.

यामुळे आता रविवार आणि सोमवार असे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










