टीम मंगळवेढा टाईम्स।
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास मंडळाच्या थेट कर्ज योजनेतंर्गत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
पात्र व इच्छुक अर्जदारांनी ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भौतिक उद्दिष्ट ७० लाभार्थी व आर्थिक उद्दिष्ट ५९ लाख ५० तर अनुदान रक्कम ७ लाख रुपये असे आहे.
या योजनेद्वारे मांग, मातंग, मिनी मादीगा, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मदिंगा या १२ पोटजातींतील व्यक्तींना अर्थसाह्य करण्यात येणार आहे.
राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कृत व्यक्ती, सैन्यदलातील वीरगतीप्राप्त झालेल्यांच्या वारसातील एका सदस्यास तसेच ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचे वय १८ ते ५० वयमर्यादेतील असावे. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा, अर्जदाराचे सिबील केंडीट स्कोअर ५०० असावा, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,
अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाखांपेक्षा जास्त नसावी. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज