mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरातील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र पळवापळवी वरून पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांचे स्पष्टीकरण; म्हणाले.., केवळ प्रशिक्षण केंद्र….

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 4, 2023
in सोलापूर
पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर; ‘या’ या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार; पीकविमा भरपाईचा मुद्दा गाजनार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र कुठेही हलवले जाणार नाही. पवारांनी ते बारामतीला पळवून नेलेलं नाही. केवळ प्रशिक्षण केंद्र बारामतीत होणार आहे, असे स्पष्टीकरण सोलापूरचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारी आदेश वाचून दाखवत दिले.

सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला गेल्याने गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी या केंद्रासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

मात्र, त्यानंतर त्यांनीही याबाबत मौन पाळले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी अन्न उत्कृष्टता केंद्राबाबत भाष्य केले.

श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्पाबाबत सुविधा नसल्याने केवळ प्रशिक्षण केंद्र बारामतीला जाणार आहे. सोलापूरला मंजूर झालेले मूळ केंद्र कुठेही हलवले जाणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी शासकीय आदेश वाचून दाखवत प्राशिक्षण केंद्राबाबत स्पष्टीकरण दिले.

हैदराबाद येथील ‘आयआयएमआर’ या कंपनीने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी 6 कोटी रुपयांचा निधी नियोजन मंडळातून देण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. या निधीमुळे गेलेलं प्रशिक्षण केंद्र परत येईल किंवा नव्याने एखादे प्रशिक्षण केंद्र मंजूर होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्पाचे प्रशिक्षण केंद्र बारामतीला जावे, असं मी म्हणतच नाही. बारामतीवाल्यांनी विकास करण्याचं काम त्यांनी अनेक वर्षे केले आहे. त्यांना जनतेची साथही मिळाली आहे.

याचा अर्थ मी अजित पवार आणि शरद पवार यांचे समर्थन करतोय, असं नाही पवारसाहेबांच्या भूतकाळासंबंधी मी बोलणार नाही आणि त्यांनी हे केंद्र पळवून नेलं नाही.

मराठा आरक्षण आंदोलकांनी दबाव निर्माण केला, तेव्हा काही आमदारांनी राजीनामा देतो, असं म्हटलं आणि काहींनी तो दिलासुद्धा. त्याचपद्धतीने आमदार सुभाष देशमुख यांच्यावरही तुम्ही लोकांनी या अन्न उत्कृष्ट केंद्रावरून दबाव निर्माण केला.

राजकीय लोकांचा तसा शब्द असतो की, वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊ, पण तो द्यायचा नसतो, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगून टाकले.(स्रोत:सरकारनामा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर पालकमंत्री चंद्रकांत पाटील

संबंधित बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 5, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
Next Post
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

नागरिकांनो! आज तहसीलदारांचे कामबंद आंदोलन; २८ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 5, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 5, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा