मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील भूमि अभिलेख कार्यालयामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी व नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत कामासाठी ताटकळत ठेवले जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांकडून कोंडून ठेवण्याचा प्रकार सायंकाळच्या दरम्यान घडला.
दरम्यान, प्रहार संघटनेचे समाधान हेंबाडे हे नगरपालिका निवडणुकीसाठी उभे असून प्रचार बाजूला ठेवून शेतकरी व नागरिकांच्या मदतीला धावून आले होते.

या कार्यालया अंतर्गत नोंद असलेल्या अनेक दस्तऐवज मध्ये वारस नोंद करणे, बँक कर्जाचा बोजा चढवणे, नवीन नोंदी प्रमाणित करणे, अज्ञान पालन नाव लावणे,

सज्ञान झाल्यावर नाव कमी करणे, हक्कसोडपत्र, बक्षीसपात्रासाठी आवश्यक दस्त उपलब्ध करणे, यासह अन्य कामासाठी 2022 पासून नागरिक हेलपाटे घालत आहेत.

याशिवाय जमीन मोजणीचे काम देखील याच कार्यालयाशी निगडीत आहे मात्र या कार्यालयाकडून या नागरिकांची कामे वेळेत केले जात नाहीत प्रत्येक वेळेला हेलपाटे मारण्यासाठी प्रवर्त केले जात आहेत.

ज्यांच्याकडून अर्थपूर्ण व्यवहार होतो त्यांच्या नोंदी तत्काळ प्रमाणात केला जातात व त्यांचे कामे तात्काळ निर्गत केले जातात परंतु ग्रामीण भागातून आलेल्या गोरगरीब नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न या कार्यालयाकडून होत आहेत.
यापूर्वी या कार्यालयाबाबत सातत्याने अनेक पक्षानी आंदोलन करून आपल्या कारभारास सुधारणा करण्याबाबतचे निवेदन दिले होते मात्र या कार्यालयाने या पक्ष कार्यकर्त्याच्या मागणीकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करून शहर व तालुक्यातील नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न कायम ठेवला.

त्यामुळे काल संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी चक्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याने शहरात खळबळ उडाली. यावेळी सिदराया माळी, युवराज टेकाळे, समाधान हेंबाडे, रोहिदास कांबळे, बापुसो घोडके, राम मेटकरी, सचिन सरवदे उपस्थित होते.
शब्द दिल्यानंतर उपस्थित नागरिकांचा रोष शांत झाला
या संदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाच्या प्रमुखाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे अधिकचा तपशील मिळू शकला नाही सर्व कार्यालयीन कर्मचारी एकत्र येऊन हेलपाटा घालून त्रस्त झालेल्या नागरिकांच्या प्रलंबित कामाचा दोन दिवसाचा निपटारा करण्याचा शब्द दिल्यानंतर उपस्थित नागरिकांचा रोष शांत झाला.- समाधान हेंबाडे तालुकाध्यक्ष प्रहार

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











