मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे
सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उडी घेतात, मात्र अपयश आल्याने अनेक जण खचून जातात.
परीक्षेत प्रत्येकालाच यश संपादित होने शक्य नसतं. परंतु, मेहनत केली तर यशाचे शिखरही आरामात गाठता येत असल्याचे दाखवून दिले
ते एका अंगणवाडी सेविकेच्या मुलीने. मेहनत आणि जिद्दीच्या भरोषावर मंगळवेढ्यातील माधुरी भीमराव माळी हिने यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली.
एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा देवून आपणही अधिकारी व्हावे, असे स्वप्न मनाशी माधुरी माळी हिने बाळगले.
माधुरीचा जन्म हा मंगळवेढा या छोट्याशा गावामध्ये झाला. आई मंगळवेढा तालुक्यात अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत. तर वडील लहानपणीच वारले.
त्यामुळे माधुरीचे प्राथमिक शिक्षण जत येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण मंगळवेढा येथील जवाहरलाल हायस्कूल व इंग्लिश स्कूल येथे आणि जत येथील राजे रामराव महाविद्यालयात बीएस्सी झाली.
2019 साली सरळ सेवा भरती परीक्षा दिली 2023 पासून माधुरी ही सातारा जिल्ह्यातील तलाठी पदावर कार्यरत आहे.
30 एप्रिल 2023 रोजी संयुक्त पुर्व परीक्षा देऊन 5 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्य परीक्षा झाली होती तर 16 जुलै रोजी निकाल लागला.
माधुरीने मिळवलेल्या यशाबद्दल आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, भैरवनाथ शुगर्सचे चेअरमन अनिल सावंत, सिध्देश्वर आवताडे,
दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, चेअरमन अभिजीत पाटील, प्रशांत गायकवाड आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.
माधुरी लहानपणापूनसच मेहनती आणि होतकरू आहे. तिने कसल्याही प्रकारचे क्लासेस न करता केवळ आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने तिने शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केले. माधुरीने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज