टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील दामाजी नगर ग्रामपंचायतमधील हनुमान नगर येथील अंगणवाडी लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्रबिंदू बनावी त्या दृष्टीने इमारतीचे काम लवकर पूर्ण करून येथील लहान मुलांना सुसज्ज अशी इमारत उपलब्ध होणार असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी दिली.
दामाजीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने रस्ते विधन विहिरी, अंगणवाडी, लाईट दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून
येथील ग्रामपंचायतीने जिल्ह्याचे नेते बबनराव आवताडे व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा धडाका लावला आहे.
येथील अंगणवाडीच्या स्लॅप भरणीचा शुभारंभ सिद्धेश्वर आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी येथील नागरिकांशी विकास कामाबाबत चर्चा देखील केली. यावेळी उद्योजक सुशील आवताडे , सरपंच सुवर्णा वडतिले , सोपान चव्हाण, जमीर सुतार, संजय जगताप , बसवेश्वर माळी,
अॅड.दत्तात्रय तोडकरी, दिलीप उगाडे , दिलीप माळी, स्वप्नील पवार, सागर वाघमारे, संदीप फडतरे, कबीर शेख, बाबासाहेब सुतार, पांडुरंग माळी,
पप्पू उगाडे, नागेश चव्हाण, अमिर चाबुकस्वार, तुकाराम भोरे, विठ्ठल उगाडे, विनोद दत्तू , मुलाणी, राजू उगाडे, राजू विठ्ठल उगाडे आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज