टीम मंगळवेढा टाईम्स ।
माझ्या गाडीचे भरपाईचे पैसे कधी देतो असे म्हणून एका फळविक्रेत्यास लोखंडी रॉडने डोकीत मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी
फिरोज सलीम मणेरी (मित्रनगर,मंगळवेढा) व दोन अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबद्दल पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी अशपाक नुरमहंमद बागवान (वय 36) हा फळविक्रेता असून
रात्री 9.30 वा. हॉटेल शिवनेरी येथून जेवण करून घरी जात असताना मंगळवेढा ते पंढरपूर रोड बायपासजवळ फिर्यादीच्या ओळखीचे
आरोपी फिरोज मणेरी व त्यांच्या सोबत असलेले दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीस तु इकडे ये माइया गाडीचे भरपाई पैसे कधी देणार असे म्हणून
शिवीगाळ, दमदाटी करून खाली पाडून लोखंडी रॉडने डोकीत मारून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच या झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या गळयातील अंदाजे एक तोळयाची चेन व रोख रक्कम 900 रुपये, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याचा अधिक तपास शहर बीट पोलिस हवालदार पठाण हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज