टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुम्ही माझ्या केसांना व्यवस्थित कलर केले नाही, माझे केस काळे होण्याऐवजी पांढरेच दिसत आहेत,असा आरोप करत एका महिलेनं सलून चालकाला चक्क चपलेने मारहाण केल्याची सोलापुरात घटना घडली आहे.
सोलापुरातल्या सात रस्ता परिसरात डायमंड हेअर सलुन आणि ब्युटी पार्लर आहे. मोहम्मद साजिद सलमाने (22) यांनी बाजार पोलीस ठाणे तक्रार दिली आहे.
सदर बाजार पोलिसांनी भा.द.वि. 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.वर्षा काळे (आयकर भवन सोसायटी,सोलापूर) असे त्या महिलेचे नाव आहे.
ब्युटी पार्लरवाल्यांना दुकानधारकाने पाच हजार रुपये बिल आकारले
सोलापुरातल्या सात रस्ता परिसरात डायमंड हेअर सलून आणि ब्युटी पार्लर आहे. या ठिकाणी 19 ऑगस्ट रोजी वर्षा काळे यांनी हेअर कट आणि हेअर कलर केले होते.
यासाठी ब्युटी पार्लरवाल्यांना दुकानधारकाने पाच हजार रुपये बिल आकारले होते. मात्र काल पुन्हा महिला पुन्हा एकदा सलूनमध्ये आली. कलर केल्यानंतर देखील माझ्या डोक्यात पांढरे केस कसे आले याचा जाब विचारत पैसे परत करण्याची मागणी केली.
कलर केलेल्या केसांचा रंग तसाच आहे नवीन येणारे केस हे पांढरे आहेत. त्याला काही पर्याय नही असे उत्तर सलून चालक मोहम्मद कासीम यांनी दिले.
यातून संताप अनावर झालेल्या वर्षा काळे यांनी चक्क चप्पलेने सलून चालकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
एवढ्यावरच ना थांबता त्यांनी दुकानातील साहित्याची नासधूस केली. तसेच सलूनमधील महागडे साहित्य देखील घरी नेल्याचा आरोप सलून चालक मोहम्मद कासीम यांनी केला आहे.
ब्युटी पार्लर चालकाने माहिती देताना सांगितले की, महिला आणि तिच्या महिलेने 19 ऑगस्ट रोजी हेअर कट, कलर केले होते. यासाठी पाच हजाराचे बील आकारले होते. पण काही दिवसानंतर ती महिला आली आणि पांढरे केस दाखवू लागली. आम्ही तिच्या डोक्यात पाहिले असता नैसर्गिकरित्या काही केस पांढरे उगवत होते.
नैसर्गिकरित्या डोक्यातून पुन्हा नव्याने येणाऱ्या केसांना पुन्हा एकदा काळे करावे लागेल असे सांगितले. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने चप्पलने मारहाण केली व दुकानातील काचा फोडल्या. याबाबत आम्ही सदर बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.(स्रोत:ABP माझा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज