टीम मंगळवेढा टाईम्स ।
वडिलांनी हयातीत काढलेले कर्ज त्यांचे मृत्यू पश्चात मयताचे वारसदार पत्नी , मुले हे परतफेड करण्यास जबाबदार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सहकार न्यायाधीश यू.एम. कुलकर्णी यांनी दिला.
मयत प्रकाश पासकंटी यांनी हयात असताना समर्थ सहकारी बँकेकडून रक्कम रुपये 3 लाखाचे सोने खरेदी करणे करीता २०१० मध्ये कर्ज काढले होते.
त्यानंतर प्रकाश पासकंटी हे २०१२ मध्ये मयत झाले. त्यांच्या नावे समर्थ सहकारी बँकेत १ लाख ६५ हजार ७५० रुपये कर्जाची रक्कम थकीत होती.
या रक्कमेसाठी मयताचे वारस जबाबदार असल्याचे सांगत कर्जाची रक्कम वसूल होणे करिता बँकेने मयत प्रकाश पासकंटी यांचे
वारसदार, पत्नी व मुले व त्याचप्रमाणे जामीनदार यांच्या विरुद्ध कर्जाच्या वसुलीसाठी सहकार न्यायालयात दावा दाखल केलेला होता.
कर्जाची रक्कम जामीनदाराकडून वसूल करण्याचे आदेश दिले. यात वारसदारांच्या वतीने अॅड.भंडारे , अॅड. नीलेश भंडारे, अॅड . राजेश गायकवाड, अॅड . मलिक कांबळे अॅड . संघपाल घोडकुंबे यांनी काम पाहिले तर समर्थ सहकारी बँकेच्यावतीने अॅड . मराठे यांनी काम पाहिले.
कोर्टाच्या या निकालामुळे सर्वसामान्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. शिवाय अडचणीत असलेल्या लोकांना मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य
याप्रकरणी मयत प्रकाश पासकंटी यांचे वारसदार पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यावतीने अॅड. जयप्रकाश भंडारे यांनी युक्तिवाद केला. मयत प्रकाश पासकंटी यांचे मृत्यू पश्चात त्यांनी काढलेले कर्जाची रक्कम मयताचे
वारसदार भरण्यास जबाबदार नाहीत , असा युक्तिवाद करून त्या संदर्भात उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले.
वारसदारांचे वकील अॅड . भंडारे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून सहकार न्यायालयाने मयत प्रकाश पासकंटी यांच्या वारसाच्या विरुद्धचा दावा फेटाळला.(स्त्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज