टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. शाळेला जाताना गडबडीत औषध समजून कीटकनाशक प्राशन केल्याने अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत झाला.
राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे गावामध्ये ही घटना घडली. वेदांत अशोक पाटील (वय 11) असे मृत शाळकरी मुलाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वेदांतने शाळेला जात असताना गडबडीत खोकल्याचं औषध समजून कीटकनाशक प्याला होता. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने
कोल्हापुरात तातडीने सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.
विजेच्या धक्क्याने सख्ख्या भावांचा मृत्यू
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथील कडवी नदीजवळ असणाऱ्या शेतात भाताच्या पिकावर तणनाशक औषध मारण्यास गेलेल्या
सुहास कृष्णा पाटील (वय 36) व स्वप्निल कृष्णा पाटील (वय 31) या सख्ख्या भावांचा अतिउच्च विजेच्या तारेचा स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना बुधवारी (3 जुलै) घडली होती.
सुहास व स्वप्निल यांनी दोन दिवसांपूर्वी कडवी नदी काठी असणाऱ्या शेतात भाताची रोप लावण केली होती. बुधवारी दुपारी येथे तणनाशक औषध मारत असताना सुहासला अतिउच्च विजेच्या तारेचा जोरदार धक्का बसला.
त्याला पाहण्यासाठी गेलेल्या स्वप्निलला सुद्धा विजेचा धक्का बसला. यातच या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेजण अजून का आले नाहीत हे पाहण्यासाठी वडील कृष्णा पाटील शेतात गेले असता त्यांना दोघेही मृतावस्थेत आढळले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज