टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात मान्सूनने रेकॉर्डब्रेक एन्ट्री घेतली असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तुफान पाऊस होत आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. पावसाची झड कायम आहे.
दरम्यान, आता पावसाने राज्यातील पहिला बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवेढा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने घरात बसलेल्या 11 वर्षांच्या बालकाच्या अंगावर भिंत कोसळून उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
गेल्या काही दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे मंगळवेढ्यात अनेक ठिकाणी मोठी पडझड होत आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ढवळस येथील योगीराज जगन्नाथ हेंबाडे या बालकाचे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता पंढरपूर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृत्यूसमयी तो ११ वर्षांचा होता.
रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जीर्ण घराची भिंत कोसळून तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून तो मृत्यूशी झुंज देत असताना अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
त्याच्या पश्चात आई-वडील, दोन मोठ्या बहिणी आहेत, काकू आणि चुलत भाऊ असा परिवार आहे. ते मराठा महासंघ युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया तालुका संयोजक सचिन हेंबाडे यांचे चुलत भाऊ होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज