टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे विद्यार्थी महासंपर्क अभियान अंतर्गत मंगळवेढा दौऱ्यावर येत आहेत.
मंगळवेढा येथील मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन आज सकाळी १० वाजता अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब रामगडे यांनी दिली आहे.
ते काल गुरुवारी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी येणार होते. आज दि.३ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत.
त्यानंतर मंगळवेढा येथील मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे. मंगळवेढा येथून सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ११ वाजता येणार आहे.
प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
सकाळी ११ ते २ यावेळेत ते प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी यांची बैठक घेणार आहोत.
त्यानंतर श्री सिद्धरामेश्वरचे दर्शन घेऊन सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालय येथे मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्घाटन होणार आहे.
सायंकाळी पाच वाजता मोडनिंब येथे शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जिल्हा मनसेच्या वतीने विविध ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी इत्यादी उपस्थित राहणार आहेत..
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज