mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नियमित बदली नसली तरी रिक्त जागी आता अशी होणार शिक्षकांची बदली; ग्रामविकास मंत्रालयाकडून शिक्षक बदलीचे पत्र निघाले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 15, 2024
in शैक्षणिक, सोलापूर
मंगळवेढ्यातील ‘या’ सरपंचाला शाळेत शिकवण्याची जबाबदारी पार पाडण्याची दुर्देवी वेळ; आमदार साहेब येण्याच्या दिवशी शिक्षक पाठवून डोळे पुसण्याचा केला प्रयत्न

टीम मंगळवेढा टाईम्स ।

नवीन भरती होण्यापूर्वी गैरसोयीत असलेल्या शिक्षकांची सोय होण्याकरिता महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शासनाकडे वारंवार प्रयत्न करण्यात आले होते. याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने २६ जून २०२३ चा शासन निर्णय देऊन भरती पूर्व प्राथमिक शिक्षकांची बदली करण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान, ग्रामविकास विभागाने सोमवारी नवा आदेश काढत यंदा नियमित बदली नसली तरी रिक्त जागेवर आता विनंतीने शिक्षकांची बदली होणार असल्याचे सांगितले आहे.

मागील वर्षीं नवीन शिक्षकांची भरती झाली नसली तरी यंदा मात्र पवित्र पोर्टलद्वारे नव्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पाडली गेली आहे.

लवकरच या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार असून यापूर्वी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते

संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब झावरे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप व राज्य कार्यकारी अध्यक्ष म.ज. मोरे, राज्य सल्लागार मंडळाचे अध्यक्ष लहू कांबळे यांच्या शिष्टमंडळाने चार दिवसापूर्वी ६ आणि ७ मार्च रोजी राज्य शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केला.

याची दखल घेत उपसचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी २०२३ च्या या शासन निर्णयाची अंमल करण्यास सांगितले. याची अंमलबजावणी राज्यातील काही जिल्हा परिषदेने करण्यास सुरुवात केली असली तरी संबंधित ग्रामविकास विभागाकडून सदरचे पत्र निघाले नसल्याने सोलापूर जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून कोणतीही हालचाल झाली नव्हती.

मात्र या पत्राने बदलीचा मार्ग मोकळा होऊन काही शिक्षकांची का होईना रिक्त जागेवर बदली होऊन त्यांची सोय होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

तीनशेहून अधिक पदे रिक्त

लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असताना वेळेत जिल्हा परिषद शिक्षण विभाग बदलीची प्रक्रिया करेल का, हे पाहावे लागणार आहे. बदली झाल्याच तर सदरच्या बदल्या ह्या रिक्त पदावर होणार असून आपल्या जिल्ह्यात साधारणपणे सर्व माध्यम मिळून तीनशेहून अधिक पदे रिक्त असल्यामुळे तितक्याच बदल्या होतील, हे मात्र नक्की.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तत्काळ ही प्रक्रिया राबवावी

सदर बदलीची प्रक्रिया राबविल्यास गैरसोयीत असलेल्या सर्व शिक्षकांची सोय होत नसली तरी २०१८-२०१९ च्या बदलीमध्ये खूप लांबच्या अंतरावर विस्थापित झालेल्या बऱ्याच शिक्षकांची काहीअंशी का होईना शाळेचे अंतर कमी होऊन सोय होण्याची शक्यता आहे, परंतु आपल्या शिक्षण विभागाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तत्काळ ही प्रक्रिया राबवावी.- सूर्यकांत हत्तुरे (डोगे), सरचिटणीस, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ…(स्त्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जिल्हा परिषद शिक्षक बदली

संबंधित बातम्या

सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 8, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
Next Post
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! मंगळवेढ्यात किरकोळ वादावादीतून भर दिवसा तरुणावर चाकू हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 8, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा