mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजी कारखान्याची निवडणुक समोर ठेऊन प्रसिध्दीसाठी केलेला ड्रामा, नगरपालिकेत होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत आत्मपरिक्षण करा; अजित जगतापांवर बोचरी टीका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 1, 2022
in मंगळवेढा
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

संत दामाजी साखर कारखान्याच्या गोडावून मधील साखर पोत्यात 90 हजार 670 तफावत असून 200 कोटी कर्ज असलेबाबत नगरसेवक अजित जगताप यांनी दिलेली बातमी खोडसाळपणाने प्रसिध्दी मिळविणेसाठी केलेला एक ड्रामा असल्याचा चांगलाच समाचार लक्ष्मण जगताप यांनी घेतला.

कारखान्याने 2017 ते 2020 या कालावधीत शसकिय लेखापरिक्षक यांचे उपस्थितीत ई ऑक्शन व्दारे रितसर परवानग्या घेवून कारखान्यातील वापरात न येणारे भंगार माल विक्री केला आहे.

तीच बातमी जशीच्या तशी नांव बदलून अजित जगताप यांनी प्रसिध्दीसाठी दिलेली आहे.

याबाबत दामाजी कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक यांनी दि.27/10/2021 रोजीचे दामाजी एक्सप्रेस या वर्तमानपत्रात सविस्तर
प्रशासकीय खुलासा प्रसिध्द केला आहे.

कारखाना स्थापनेपासून आपला ऊस
दामाजी कारखान्यास गळीतास किती वेळा आला आणि बाहेरच्या कारखान्यास कितीवेळा गेला, कारखाना कामकाजासाठी काय योगदान आहे, कारखान्यातील कर्जाविषयी आपण जी मुक्ताफ़ळे उधऴली त्या विषयी माहिती घेवून बोलला असता तर बरे झाले असते.

मागील तीन वर्षापासून राज्य बँकेचे खेळते भांडवली कर्ज मिळू नये म्हणून काही विघ्न संतुष्टानी प्रयत्न केल्याने राज्य बॅकेकडून कर्ज मिळू शकले नाही. त्यामुळे कारखाना अर्थिक अडचणीत आला परणामी कारखान्याने साखर विक्रीतून सर्व व्यवहार पारदर्शी केलेले आहेत असे परखड मत कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप यांनी दिलेल्या प्रसिध्दी पञकात व्यक्त केले.

मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची इतर कारखान्याला ऊस पाठवताना होणारी हेळसांड पाहून स्व.किसननलाल मर्दा उर्फ मारवाडी वकील यांनी साखर कारखाना निर्मितीचे स्वप्न पाहिले व स्व.रतनचंद शहा शेठजी यांना सोबत घेवून दामाजी साखरकारखान्याची उभारणी केलेचे मंगळवेढा तालुक्यातील संपूर्ण जनतेला माहित आहे.

सोलापूर जिल्हयातील इतर सहकारी साखर कारखान्यापेक्षा दामाजी कारखान्याची परिस्थिती चांगली असून आमदार समाधान आवताडे यांचे संचालक मंडळ सत्तेत आलेपासून मागील सहा हंगाम अडचणीवर मात करत यशस्वीरित्या पार पाडले आहेत.

यापैकी मागील पाच हंगामात गळीतास आलेल्या ऊसाची एफ.आर.पी व प्रसंगानुसार एफ.आर.पी पेक्षा जास्त ऊसदर देवून ऊस उत्पादक सभासद – शेतक­यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ऊस तोडण्ी वाहतुकीची बीले व कामगार पगारही मागील हंगाम 2020-21 अखेरची दिलेली आहेत.

तसेच चालु 2021-22 हंगामातील कामगारांचे पगार वेळेवर केले असून माहे मार्च 2022 चा पगार वेतनमंडळाच्या शिफारसीप्रमाणे 12 टक्के वाढीसह अदा केलेला आहे.

यामुळे वाढलेल्या महागाईच्या काळात प्रत्येक कामगाराला 3500 ते 4500 रुपये दरमहा पगारवाढ झालेली आहे त्यामुळे व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये समन्वय आहे.

दामाजी कारखान्याच्या स्थापनेपासून समाधान आवताडे हे आमदार म्हणून लाभलेले पहिले चेअरमन आहेत. कारखान्याच्या वजनकाटयावर व संचालक मंडळावर शेतक-यांचा असणारा विश्वास,

ऊस तोडणी वाहतुकदार यांचे सहकार्य व कामगारांचे कारखान्यावर असलेले प्रेम यामुळे कारखान्याने गळीत हंगाम 2021-22 मध्ये 385060 मे.टन गाळप करुन 397500 Ïक्वटल साखर उत्पादन केली आहे. सरासरी साखर उतारा 10.36 असून आपला
दामाजी कारखाना सोलापूर जिल्हयात साखर उता-यात दुस-या क्रमांकावर आहे.

आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरळीत चालु आहे. कारखान्याचे चेअरमन आमदार समाधानदादा आवताडे यांच्यासारख्या उद्योगपतीचे साम्राज्य पाहता आपण त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप
बिनबुडाचे आहेत.

आपण नगरसेवक म्हणून काम करत असताना नगर पालिकेत होणा-या भ्रष्टाचाराबाबत आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.

निवडणुकी नंतर येणारे संचालक मंडळ हे आमदार समाधानदादा यांच्या नेतृत्वाखाली येणार असलेचा इशाराही संचालक लक्ष्मण जगताप यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिला आहे.

साखर विक्रीतुन कारखान्याचा पारदर्शक व्यवहार

साखर विक्रीतुन कारखान्याचा पारदर्शक व्यवहार झालेला असुन भ्रष्टाचार झालेला नाही.200 कोटीचे कर्ज असलेचा आरोप चुकीचा व निराधार आहे. भंगार विक्री रितसर ई-ऑक्शन द्वारे झाले असुन शासकीय मुल्यांकनापेक्षा जादा किंमत कारखान्याला मिळालेली आहे.- रमेश गणेशकर, कार्यकारी संचालक,श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना.
—————–
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित जगतापसंत दामाजी साखर कारखाना

संबंधित बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संतांच्या भूमीत जुगाराचा विळखा; तरुणाई कर्जबाजारी, प्रशासन मात्र सुस्त; जुगार क्लबमुळे तरुणांचे भविष्य पणाला, यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष?

March 17, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकर सावधान! घरगुती गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ चूक पडेल महागात; व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

March 14, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! मंगळवेढ्यात माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला; लोखंडी साखळी अन् केबलने बेदम मारहाण, मोबाईलही लुटला

March 14, 2026
Next Post
सोलापूरात येणार ‘हे’ नवे 23 पोलिस अधिकारी! 33 अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली

सोलापूर जिल्ह्यातील 17 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदक, यांचा समावेश; आज पुरस्कार वितरण सोहळा

ताज्या बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा