टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगत भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेला अटक झाली आहे. मनोहर भोसलेला अटक झाल्यावर त्याची अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत.
अशातच मनोहर भोसले आणि त्याच्या दोन साथीदारांवर बलात्कार केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता मनोहर भोसलेच्या दोन साथीदारांच्या शोधावर आहेत.
करमाळ्यातील आश्रमात मनोहर भोसले आणि त्याच्या दोन साथीदारांवर 2018 ला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या मनोहर भोसले बारामती आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात तुरूंगात शिक्षा भोगत आहे.
भोंदू बाबा मनोहर भोसलेनं बारामतीतील तरुणाची फसवणुक करत तब्बल 2 लाख 51 हजारांचा गंडा घातला होता. याप्रकरणी त्याला सातारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. मनोहरच्या अटकेनंतर बलात्कार प्रकरणी आता त्याच्या साथीदारांचाही शोध सुरु आहे.
दरम्यान, बारामती प्रकरणात मनोहर भोसलेची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यावर करमाळा पोलीस त्याला ताब्यात घेणार आहे. याशिवाय त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत असून पोलिसांना त्यांना पकडण्यात यश येतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज