टीम मंगळवेढा टाईम्स।
शासकीय कार्यालयातील काम आणि 6 महिने थांब याची प्रचिती सर्वसामान्य नागरिकाला नेहमीच येत असते. तहसील कामासाठी आलेल्या नागरिकांना मात्र हाच त्रास कमी करण्यासाठी मंगळवेढ्याच्या तहसीलदारांनी कार्यालयीन कामकाजासाठी दररोज नवनवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करून या प्रक्रियेला आळा घालण्याचा प्रयत्न केला.
नागरिकांची वर्दळ ही तहसील, पंचायत समिती,भूमी अभिलेख,कृषी, या कार्यालयात असल्याने त्याठिकाणी अनेकांना वेगळाच अनुभव येतो. त्याप्रमाणे तहसील कार्यालयात दररोज आलेल्या नागरिकांची कामे ही रेकॉर्ड रूम मधील जुने अभिलेख शोधणे व विविध शासकीय कामासाठी व खाजगी कामासाठी आवश्यक असणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यासाठीची वर्दळ नेहमी असते
मात्र हीच सही मिळणे आणि अभिलेख मिळताना नागरिकांना त्रास होत आहे काही वेळेला रेकॉर्ड रूम मधील कर्मचाऱ्याकडून जुने रेकॉर्ड उपलब्ध नाही सापडत नाही समोर अर्ज भरपूर आहेत वेळ लागेल अशी कारणे सांगितल्यानंतर साहजिकच अर्जदाराने अर्थपूर्ण व्यवहार केल्यानंतर मात्र काही वेळात ही कागदपत्रे उपलब्ध केली जातात असा प्रत्यय अनेकांना यापूर्वी आलेला आहे.
अगदी तोच प्रत्यय प्रतिज्ञा पत्रावरील सहीसाठी येतो याचा फटका ग्रामीण भागातील महा ई सेवा केंद्र चालकांना देखील सोसावा लागला.त्यामुळे महसूल खाते हे बदनाम ठरत आहे. त्याकडे कार्यालयीन प्रमुखांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांनी यापूर्वी लाचलुचपत पथकाचा आधार घेतला.त्यामध्ये पुरवठा निरीक्षक,मंडल अधिकारी,तलाठी,अडकले.मात्र दोन महिन्यापूर्वी तहसीलदार पदाचा पदभार स्विकारला.
मदन जाधव यांनी कार्यालयातील वर्दळीचे ठिकाणी लोकांना त्रास न होईल अशा पद्धतीची भूमिका घेत प्रतिज्ञापत्रासाठी होणारी टाळाटाळ तसेच जुने अभिलेख घेताना अर्जदाराकडून पैसे मिळावे यासाठी रेकॉर्ड उपलब्ध नाही यासाठी टाळाटाळ केली जाते मात्र पैसे दिल्यानंतर तात्काळ हेच काम केले जाते.
पैशासाठी होणारी अडवणूक लक्षात घेता आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसासाठी दररोज नवनवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यामुळे एकाच टेबलवर ठाण मांडून पैशासाठी सहीसाठी अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र याचा फटका बसणार आहे.
तहसीलदार मदन जाधव यांनी प्रतिज्ञापत्र व रेकॉर्ड या दोन ठिकाणी पाच दिवस वेगळे कर्मचारी नियुक्त करून या सर्व खाबगिरीला आळा घातला. त्यांच्या या नव्या बदलाच्या प्रयत्नाचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक केले जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज