टीम मंगळवेढा टाईम्स :
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे मंगळवेढ्यातील शेख कुटुंबाचे प्रमुख जनाब हाजी बादशाह अमीर शेख (गुरुजी) यांचा आज शंभरावा वाढदिवस आहे.

हाजी बादशहा शेख गुरुजी यांचा 100 वा वाढदिवस जोगेश्वरी मंगल कार्यालय, बायपास रोड, येथे आज दुपारी 12 वाजता साजरा केला जाणार आहे.

वयाची 100 वर्षे मोठ्या आनंदानी मोठ्या उत्साहात घालवली तिथेच त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. तसेच वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला मंगळवेढा तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले यांच्यासह इतर नामवंत उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अब्दुलगफूर शेख, युन्नूस शेख, हाजी अजीम शेख, हाजी बशीर शेख, रशीद शेख व शेख परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














