टीम मंगळवेढा टाईम्स।
एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जातीवाचक शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणात आरोपी तथा दामाजी ग्रामपंचायत सदस्य आण्णासो आसबे (रा.मंगळवेढा) याची पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी.बी.तोष्णीवाल यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
या घटनेची हकीकत अशी, दि.22 जून 2022 रोजी फिर्यादी 25 वर्षीय मावशी हीस बरोबर पिडीता आंबे आणण्यासाठी मंगळवेढा येथील मंडईत आली होती.
आरोपी आण्णासो आसबे व फिर्यादी यांची तोंड ओळख असल्याने पाण्याची बॉटल आणावयास गेलेल्या पिडीतेस एमआयडीसी मध्ये चल असे वाईट भावनेने म्हणून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
त्यावेळी फिर्यादीने रागाने आरोपीला तू लहान मुलीस असे का करु लागला? असे म्हणाली. त्यावेळी आरोपीने फिर्यादीस तुझा काय संबंध आहे? असे म्हणत जातीवरुन शिवीगाळ करीत अश्लील भाषा वापरल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते.
या घटनेचा तपास डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी करुन आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या घटनेची सुनावणी दरम्यान पिडीतेने मी आरोपीला ओळखू शकत नसल्याचे सांगितले. तद्नंतर आरोपीचे अॅड.तानाजीराव सरदार यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
सरकार पक्षाच्यावतीने ए.जी.कुर्डुकर यांनी काम पाहिले.दरम्यान पाेक्साेकायद्या आतर्गत दाखल आसलेल्या गुन्हाचा निकाल केवळ १३ महिन्यात न्यायालयाने दिला आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज