टीम मंगळवेढा टाईम्स ।
तु माझा फोन का घेत नाही, तु मला न विचारता ग्रामसभा का घेतली ” असे म्हणत शासकीय कर्तव्य बजावत असतांना ग्रामसेवकास अडथळा आणून, शिवीगाळ करुन दमदाटी करत हाताने धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बालाजीनगर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाची पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीकांत मधुकर ठेंगील हे बालाजीनगर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून फिर्यादी हे ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेअंतर्गत

काल दि.17 सप्टेंबर दुपारी 2.15 वाजता ग्रामसभा घेऊन जिल्हा परिषदेने सध्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना व रमाई आवास घरकुल योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवकाच्या माध्यमातून सक्ती केली.

सदर ग्रामसेवक गावातील लाभार्थी यांचे गावातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेच्या मंजूर घरकुलाची पाहणी करुन कार्यालय मध्ये येत असताना दत्तात्रय उर्फ संजय किसन राठोड त्याने माझा फोन का घेत नाही,


मला न विचारता ग्रामसभा का घेतली, असे विचारून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सध्या लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी वाळू देण्याचा शासन निर्णय झाला असताना देखील वाळू न देता तोकड्या अनुदानात प्रशासनाकडून घरकुल उद्दिष्टपुर्ती व अन्य कामाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसेवकांच्या माध्यमातून तगाडा लावला जात आहे.

एक तर अतिरिक्त कामाचा व्याप आहे.एका ग्रामसेवकावर अनेक गावाचा पदभार असल्यामुळे काही ठिकाणी काम करताना अडचणी विलंब होत आहे अशा परिस्थितीत त्यावेळी प्रशासनाकडून दबाव तंत्र आणि ग्रामस्थांकडून अरेरावी या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे.

तर काही गावात वारंवार तक्रारी येत असल्यामुळे त्या गावाच्या पदभार घेण्यास काही ग्रामसेवकाची इच्छाशक्ती नाही. परंतु प्रशासनाच्या प्रशासनाच्या आदेशामुळे काम करावे लागते मात्र प्रशासन अशावेळी ग्रामसेवकाच्या पाठीशी न राहता तक्रारदाराच्या पाठीशी राजकीय दृष्टिकोनातून राहत असल्याचा सूर दबक्या आवाजात व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











