टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील ३५ गावातील उपसासिंचन योजनेबाबत त्रुटी पूर्ण करून भरघोस निधी उपलब्ध करण्याबाबत बैठक घेण्याची विनंती करणारे निवेदन विठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजित पाटील यांनी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथे सादर केले व महत्त्वपूर्ण विषयांवर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री यांना भेटून संवाद साधला.
पंढरपूर-मंगळवेढा-सोलापूर जिल्हात पाऊस खुप कमी पडल्यामुळे दुष्काळ जाहीर करुन जनावरांसाठी चारा डेपो सुरु करावा, उजनी व वीर धरणातून नदी व कॅनल साठी पाणी सोडावी, वीज खंडीत करु नये, पिकांना व पर्यायाने शेतकऱ्यांना जीवनदान देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणेबाबत निवेदन सादर केले.
अनेक वर्षांपासून मंगळवेढातील ३५ गावांपैकी २४ गावांची उपसासिंचन योजना अंतिम टप्प्यात आहे. तरी उर्वरित गावे तांत्रिक बाबींमुळे शासनाच्या लाल फितीत अडकल्या आहेत. त्या योजनातील त्रुटी पूर्ण करण्यात याव्यात व मुबलक निधी मंजूर करावा असे निवेदन यावेळी अभिजित पाटील यांनी दिले.
संतभूमी मंगळवेढ्यात महात्मा संत बसवेश्वर स्मारकासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात स्मारकाची घोषणा केली होती.
परंतू अद्याप स्मारकास निधी उपलब्ध झालेला नाही. त्याबाबत निधी उपलब्ध करून तातडीने कामास सुरुवात करावी अशी विनंती देखील या निमित्ताने केली पाटील यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज