टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील शिरसी -लेंडवे चिंचाळे या मार्गावर निष्काळजीपणे दुधाचा टँकर चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लखन कैलास कोळी यास जोराची धडक देवून गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात दुध टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी कैलास आप्पासो कोळी (रा.शिरसी) हे ट्रक चालक असून दि.३ जून रोजी दुपारी ३.३० वा. शिरसी ते लेंडवे चिंचाळे या रोडने त्यांच्या ताब्यातील ट्रक नं. एम एच १२ एस एक्स ६ ९ ७२ हा जालिंदर लेंडवे यांच्या शेताजवळून जात असताना समोरून अचानक कुत्रा आडवा आल्याने ट्रक रोडच्या डाव्या बाजूला असलेल्या चारीमध्ये फसली.
यावेळी फिर्यादीचा मुलगा तथा मयत लखन कोळी हा रोडवर थांबला होता. यावेळी समोरून टी. एन . ३४ डब्ल्यू ३८४८ या क्रमांकाचा दुधाचा टँकर आला.
सदर टँकरच्या चालकाने परिस्थितीकडे न पाहता हयगयीने अविचाराने टँकर चालवून उभा असलेल्या लखन यास जोराची धडक देवून त्यास गंभीर जखमी करून मृत्यूस कारणीभूत झाला असल्याची
फिर्याद मयताच्या वडिलांनी दाखल केल्यानंतर अज्ञात टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार मोरे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज