टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापुरात बायको माहेरी गेल्याच्या कारणामुळे तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मोसीन गफार मियां काझी (वय ३६ रा.पांडुरंग वस्ती तालुका पोलीस स्टेशन जवळ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मोसीन मार्केट यार्डमध्ये मालवाहतूक गाडी चालवत होता.
गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कौटुंबिक वादामुळे पत्नी माहेरी गेली होती. यामुळे तो मानसिक तणावात होता.
यातूनच त्याने राहत्या घरी ओढणीच्या छताच्या फॅनला साहाय्याने गळफास घेतला. ही घटना कुटुंबीयांना कळताच त्याच्या आईने व शेजारील लोकांनी
त्याला खाली उतरवून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज