मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अक्कलकोट तालुक्यातील रामपूर कॉम्प्युटर ऑपरेटर तथा सरपंच पुत्र श्रीकांत इरण्णा बिराजदार (वय (२८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना बुधवार दि.१७ मे रोजी सकाळी सहा वाजता घडली. याबाबत दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचे लग्न ठरलेले होते. रविवारी अक्षतादेखील पडणार होत्या. श्रीकांत हा मागील काही वर्षांपासून म ग्रामपंचायत कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम पाहत होता.
त्याचं लग्न ठरलं होतं. येत्या रविवारी र २१ मे रोजी विवाह होणार होता. बुधवारी सकाळी त्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाच्या फांद्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी आहेत. तो सरपंच शोभा बिराजदार यांचा मुलगा होता. बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
विहिरीत पडून विवाहित महिला मयत
मंगळवेढा येथील शेतातील विहिरीवर मोटर चालू करण्यास गेलेल्या २५ वर्षीय विवाहित महिला पाण्यात पडून बुडून मृत पावल्याची घटना घडली असून वर्षा हरी सरगर असे मयत विवाहितेचे नाव आहे.
दरम्यान, या घटनेची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत वर्षा हरी सरगर ही दि. १३ रोजी सकाळी ६.०० वा. चोखामेळानगर हद्दीतील सरगर वस्ती येथे जमीन गट नं.६२० मधील विहिरीवरील मोटर चालू करण्यास गेली असता
ती पाण्यात पडून बुडून मयत झाली असल्याचे दीर दामाजी सरगर यांनी दिलेल्या खबरी जबाबात म्हटले आहे.
सकाळी ६.०० वा. मोटर चालू करण्यास गेलेली भावजय ११.०० वाजेपर्यंत परत न आल्याने तीचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही. गावातील नागरिक शोध घेत असताना विहिरीजवळ गेल्यावर मयताच्या पायातील चप्पल काठावर दिसली.
त्यावरून विहिरीत पडली असावी अशी शंका व्यक्त करीत मोटारीने विहिरीतील पाण्याचा उपसा केला असता मयत वर्षा ही पाण्यात बुडल्याचे दिसून आले.
तात्काळ त्यांनी वर्षा हिस मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून उपचारापुर्वीच ती मयत झाल्याचे सांगितले. दरम्यान वर्षा हिचा विवाह २०१५ साली झाल्याने ही दुर्घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अधिक तपास पोलिस हवालदार एम. एम. पठाण हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज