टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा शहरातील एका अल्पवयीन मुलीला कशाचे तरी अमिष दाखवून मोटर सायकलवर बसवून तीला पळवून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अजय बाबू कोळी (रा.लक्ष्मी दहिवडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील अल्पवयीन मुलगी ही दि . २२ रोजी शहरातील एका बांधकामाच्या ठिकाणी कामाला गेली होती. सदर आरोपीही काम करीत होता.
दुपारी २.०० वा. जेवणाची सुटी झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी व व तीची बहिण जेवणासाठी बसल्या झाल्यानंतर यातील कशाचे तरी अमिष आरोपीने दाखवून अल्पवयीन मुलीला मोटर सायकलवरून पळवून नेले.
या घटनेनंतर सदर अल्पवयीन मुलीच्या बहिणीने वडिलास घटनेची हकिकत सांगितल्यानंतर सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती मिळून आली नाही.
पिडीतेच्या वडीलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज