टीम मंगळवेढा टाइम्स ।
सोलापुरातील एका महिलेला गिफ्ट पार्सलचे आमिष दाखवून २१ लाख ८६ हजार ४४३ रुपयांची फसवणूक केल्याची घटना २० जून ते १९ जुलै दरम्यान घडली.
या प्रकरणी सदर महिलेने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून , त्यांच्या फिर्यादीवरून कॅप्टन मॅक्सवेल लूकास , कल्याणी , राहुल कुमार अशा नावांच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, त्या महिलेच्या व्हॉट्स अॅपवर विविध नंबरवरून वेळोवेळी संपर्क साधून गिफ्ट पार्सलचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला.
त्यानंतर वरील संशयित आरोपींनी त्यांच्या युनियन बँक खाते क्रमांकामधून ६ लाख ४० हजार रुपये, कोटक महिंद्रा बँकेमधून ६ लाख ९० हजार रुपये, एसबीआय बँकेमधून ९ ६ हजार रुपये,
इंडियन बँकेतून १ लाख रुपये, कॅनरा बँकेतून २ लाख ५४ हजार रुपये व पंजाब नॅशनल बँकेमधून ३ लाख १० हजार रुपये असे मिळून एकूण २० लाख २९ हजार रुपये वरील आरोपींनी त्यांच्या विविध खात्यांवर जमा करण्यास सांगितले.
तसेच राहुल कुमार याने त्याच्या मोबाईल क्रमांकावरून फोन करून फिर्यादी महिलेस अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून पुन्हा ९३ हजार ४४३ रुपये डेबिट केले.
असे मिळून एकूण २१ लाख ८७ हजार ४४३ रुपये जमा करून घेऊन फिर्यादी महिलेची आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक करणकोट हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज