टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर परिसरातील बंद घराचे भरदिवसा कुलूप तोडून घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 65 हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळवून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्याने चोरटे बंद घरांना टार्गेट करीत असल्यामुळे बाहेर गावी जावे की नाही असा प्रश्न कुटूंबियांना चोरीच्या धास्तीमुळे पडला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी विशाल चव्हाण हे रुक्मिणीमाता नगर येथे रहावायास असून वडील भैरवनाथ शुगर कारखान्यात मुख्य शेती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
दि. 28 रोजी सकाळी 9.30 वाजता वडील कारखान्यात गेले, बहिण जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर गेली असता फिर्यादीच्या आईने घराला व गेटला लॉक करुन ज्वारी काढण्यासाठी सोनलगी येथे गेली होती.
सदर कामे उरकून रात्री 11 वाजता घरी आल्यावर मुख्य दरवाजाचे लॉक तुटून खाली पडल्याचे दिसले. घरात जाऊन पाहिले असता घरातील कपडे अस्ताव्यस्त पडलेली दिसून आली.
कपाटात डब्यात ठेवलेले सोन्याचे गंठण (दीड तोळा,45 हजार रुपये) किंमतीचे व पर्स मध्ये ठेवलेले 20 हजार रोख रक्कम असा एकूण 65 हजाराचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
आत्तापर्यंत झालेल्या चोर्या या कुलूपबंद घरामधील असून चोरटे बंद घराला टार्गेट करत असल्यामुळे कुटूंबाने कुठे बाहेर गावी जावे की नाही असा प्रश्न पडला आहे.
पोलीसांनी आत्तापर्यंत बंद घराच्या झालेल्या चोर्याचा शोध घेवून चोरटयांना जेरबंद करावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज