टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहर पोलीस दलातील सदर बझार पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यास पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.
नाना वेशा शिंदे (वय ३७, रा. अरविंद धाम पोलीस लाईन, सोलापूर) असे लाच घेतलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार याच्याविरूध्द सीआरपीसी १०७ प्रमाणे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तक्रारदार याना सदर बझार पोलीस ठाणे,
सोलापूर शहर येथे २ मे ते १० मे २०२२ या कालावधीमध्ये दैनंदिन हजेरी लावण्यात आली होती.
त्यानुसार सदर बझार पोलिस ठाणे येथे हजर राहून हजेरी लावली असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्याकरिता
पोलीस नाईक नाना शिंदे यानी तक्रारदारास ५०० रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारलेे असताना त्यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, उमाकांत महाडिक, पोलीस नाईक पकाले, घुगे, लण्णके यांनी पार पाडली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज