मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
शिक्षकाच्या नावाने ‘इन्स्टाग्राम’ वर बनावट खाते सुरू करून त्याद्वारे त्यांच्या ओळखीच्या विद्यार्थीनीशी संवाद साधत तिला १८ हजार ५०० रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी संजयकुमार देशमुख (रा.इसबावी) ही विद्यार्थिनी सध्या येथील महाविद्यालयात ‘बीसीए’ अभ्यासक्रमाचे शिक्षण घेते. इयत्ता दहावीत असताना तिला समीर सुरेश दिवाण (रा.इसबावी) नावाचे शिक्षक होते.
दि. ३ मे रोजी रात्री १०.४५ वाजता वैष्णवी ही आपला मोबाईल पाहत असताना दिवाण यांच्या नावाने तिला रिक्वेस्ट आली. त्यावर ओळखीच्या शिक्षकांचा फोटो असल्याने तिनेही ती स्वीकारली.
काही वेळाने त्या शिक्षकाच्या नावाच्या खात्यावरून मेसेज येऊ लागले. दोघांत संवाद झाला. दरम्यान, माझा मित्र रूग्णालयात अत्यवस्थ आहे. त्याच्यासाठी मला पैशाची तातडीने गरज आहे, असे नमूद करून त्या खात्यावरून वैष्णवी हिच्याकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली.
दवाखान्यातील फोटोही पाठविले. तसेच दुसऱ्या दिवशी पैसे परत करतो, असा शब्द दिला गेला. त्यानुसार विश्वास ठेऊन वैष्णवी हिने आपल्या ‘गुगल पे’ वरून दोनवेळा एकूण १८ हजार ५०० रूपये पाठविले.
दुसऱ्या दिवशी तिने दिवाण यांच्या मोबाईलवर संपर्क साधून पैशाची मागणी केली असता त्यांनी आपण पैसे मागितलेच नसल्याचे सांगितले.
अखेर अज्ञात भामट्यांनी सदर शिक्षकाच्या नावाने फेक खाते तयार करून ऑनलाईन फसवणूक केल्याचे चौकशीअंती समोर आले. याबाबत येथील स्टेट बँकेत आणि पोलिसांत तिने तक्रार दाखल केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज