टीम मंगळवेढा टाईम्स ।
शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी मंगळवेढा तहसीलदारांना निवेदन देणार असल्याची माहिती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड . नंदकुमार पवार यांनी दिली.
माजी केंद्रीय कृषिमंत्री , महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री , महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या घरावर नुकताच भ्याड , निंदनीय प्रकार घडला.
ज्यांनी उभी हयात समाजासाठी घालवली, वयाचा आणि आजाराचा विचार न करता पायाला भिंगरी लावून समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले
त्या थोर व्यक्तीबद्दल जाणून बुजून व राजकीय हेतूने प्रवृत्त करून गोंधळ घातला. याचा महा विकास आघाडी निषेध करते.
आज सोमवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार यांना महाविकास आघाडीतर्फे हल्ल्याचा निषेध व चौकशी करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.
तरी सर्व महा विकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज सोमवारी सकाळी १०.३० वा . दामाजी पुतळ्याजवळ उपस्थित रहावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड . नंदकुमार पवार यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज