टीम मंगळवेढा टाईम्स ।
आम्ही जातो आमच्या गावा आमुचा राम राम घ्यावा असे व्हाट्सएपवर स्टेस्ट्स लिहून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे घडली आहे.
रमेश गजानन चौगुले (वय 25) याने पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची खबर पोलीस पाटील संजय गरंडे यांनी दिली.
आत्महत्या केलेला कमी वयातील असल्यामुळे त्याच्या आत्महत्या बद्दल ग्रामस्थातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मात्र ऐन तारुण्यात हा मार्ग स्वीकारण्यापर्यंत त्यांचे धाडस का झाले हा विषय मात्र चिंतेचा ठरू लागला आहे दिवाळीच्या सणांमध्ये तिघांच्या मृत्यूने गावकऱ्यावर दिवाळीचा उत्साहातील सण साजरा करण्यावर संक्रात कोसळली.
दिवाळीच्या तोंडावर चार दिवसात नंदेश्वर येथे तीन वेगवेगळ्या घटनेत झालेल्या तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून या घटनेमुळे गावकऱ्याना दिवाळीचा सण साजरा करण्यावर संक्रात आली.
दक्षिण भागामध्ये भोसेनंतर नंदेश्वर हे सर्वात मोठे गाव हे असून या गावांतील लोकांचा दूध व्यवसाय बरोबर ऊस तोडणी व्यवसायाशी अधिक संबंध येत आहे.
रोजगार आणि व्यवसायातील कष्टातून पैसे मिळवणे,धार्मिक व घरगुती सण साजरा करताना खुल्या मनाने पैसे खर्च करणे ही या गावाची विशेष खासियत.
सध्या बहुतांश कारखान्यांनी गाळप हंगाम सुरुवात केल्यामुळे सध्या ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांची पळापण सुरू असतानाच अनेक मजुरांनी दिवाळीचे गोडधोड खाऊन ऊसतोडणी साठी जाण्याचा संकल्प केला आहे.
परंतु गावामध्ये धनगर समाजाचे लोक जास्त असून सगळे नात्यागोत्यात गुंतले आहेत अशा परिस्थितीत दिवाळीच्या सणातील चार दिवसात तिघांच्या निधनाने सणावर संक्रात कोसळली.
त्यामध्ये पहिल्या घटनेत शेतजमीन नावावर करणे करीता अंगठा का देत नाही या रागाच्या भरात जावयाने सासू शाकुबाई मारुती कोकरे (वय.47 रा. नंदेश्वर) हिचा चाकूच्या सहाय्याने जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ (रा.नंदेश्वर) गळयावर भोकसून खून करुन अज्ञात चोरटयांनी खून केल्याचा बनाव केल्याचे तपासात उघड झाले.
तर काल दुसऱ्या घटनेत मारुती हरिबा मोटे (वय 39) याने दारूच्या नशेत क्रेमकोन नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
सुरुवातीच्या काळात सदर मयता बाबत ओळख पटत नव्हती परंतु सोशल मीडियातून मृताचा फोटो व्हायरल केल्यानंतर नातेवाईक लगेच घटनास्थळी हजर झाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज