mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

एसटीचा पास विसरला, पप्पांना फोन करा, ते पैसे देतील अशी विनवणी; तरीही कंडक्टरने भर हायवे-वर चिमूरड्याला बसमधून उतरवले; तातडीने आमदार आवताडेंनी केली ‘ही’ मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 12, 2026
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला हायवेवर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर मंगळवेढा एसटी बसमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

हाचिमुरडा कंडक्टरला वारंवार आपल्या ‘पप्पांना फोन करा…’ ते पैसे देतील, अशी विनवणी करीत असतानाही या कंडक्टरने या लहानग्याला दप्तरासह हायवेवर वाहनांच्या गर्दीत उतरविल्याची संतापजनक घटना घडली आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर आमदार समाधान आवताडे यांनी तातडीने विभागीय वाहतूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना पत्रव्यवहार करून संबंधित एस.टी. च्या वाहकाची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करणेत यावी.

आणि या पुढे असे प्रकार घडून नयेत याची दक्षता घेणेबाबत सर्व वाहक चालकांना ताबडतोब सूचना देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सदर प्रकारामुळे पालक, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील प्रथमेश राहुल पाटील हा सातवीतील विद्यार्थी रोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये-जा करतो.

शनिवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजता तो मंगळवेढा आगाराची सोलापूर-मंगळवेढा (बस क्रमांक ९४०५) या एसटीने प्रवास करत होता. ब्रह्मपुरीपासून काही अंतरावर बस आल्यानंतर वाहक तिकीट काढण्यासाठी आला. यावेळी प्रथमेशने बॅगमध्ये पास शोधला असता, तो चुकून घरी राहिल्याचे लक्षात आले.

घाबरलेल्या प्रथमेशने वडिलांना फोन करण्याची विनंती केली.’पप्पा पैसे देतील,’ असे तो वारंवार सांगत होता. मात्र त्या निरागस शब्दांनाही वाहकाने किंमत दिली नाही. क्षणाचाही विचार न करता, सायंकाळच्या वेळी, भरधाव वाहनांच्या गर्दीत बसचा दरवाजा उघडून त्या चिमुकल्याला थेट महामार्गावर उतरवण्यात आले.

डोळ्यांत पाणी, मनात भीती आणि आजूबाजूला धावणारी वाहने

अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेश गोंधळून गेला. डोळ्यांत पाणी, मनात भीती आणि आजूबाजूला धावणारी वाहने…अखेर त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला हात दाखवला. त्या व्यक्तीच्या मदतीने तो कसेबसे घरी पोहोचला. घरी आल्यानंतर त्याच्या थरथरत्या आवाजात घडलेला प्रकार ऐकून कुटुंबीय हादरून गेले. या घटनेनंतर पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

‘पास विसरणे ही चूक असू शकते; पण त्यासाठी लहानग्या विद्यार्थ्याला महामार्गावर उतरवणे म्हणजे त्याच्या जीवाशी खेळ आहे,’ असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी पालक राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त,जिल्हा आगार प्रमुख व तालुका आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित वाहकावर निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे. सरकार मोफत पास देते, पण एसटीत माणुसकी कुठे हरवली?, असा सवाल उपस्थित होत आहे.

धडा शिकवणारी कठोर कारवाई करा

एकीकडे राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सवलती देत एसटी महामंडळाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे, एका पाससाठी चिमुकल्याला चक्क महामार्गावर उतरणारे निष्टुर हात या सगळ्या निर्णयांची थट्टा करत आहेत.संवेदनाहीन, मुजोर वर्तनामुळे आज एका मुलाचा जीव धोक्यात आला. उद्या हेच प्रकार कुणाच्या नशिबी येणार, हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात आहे.अशा घटनांमुळे केवळ एखाद्या कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण एसटी महामंडळाच्या विश्वासार्हतेचे नुकसान होत आहे. आता केवळ चौकशी नव्हे, तर धडा शिकवणारी कठोर कारवाईच आवश्यक असल्याची तीव्र मागणी नागरिकांतून होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: एसटी बस

संबंधित बातम्या

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 12, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणूक खर्च बँकेमार्फत बंधनकारक नाही; कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

January 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेतील आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; नोंदणी-व्हेरिफिकेशनमध्ये चूक नको; ‘या’ तारखेपर्यंत शाळा नोंदणी करा पूर्ण…

January 12, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! बापाने विहिरीत ढकलून जुळ्या मुलांचा घेतला जीव; सोलापूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना; पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

January 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कारभाऱ्यांनो आता चालणार नाही! केंद्र सरकारची ‘सरपंच पती’ प्रथेबाबत मोठी घोषणा; गाव पुढाऱ्यांना पंचायत राज मंत्रालयाचा दणका

January 10, 2026
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठी खिंडार; प्रदेश चिटणीस सायरा शेख यांचा राजीनामा; ‘या’ पक्षाच्या उमेदवारांना देणार पाठींबा?

सोलापुरात राष्ट्रवादीला मोठी खिंडार; प्रदेश चिटणीस सायरा शेख यांचा राजीनामा; ‘या’ पक्षाच्या उमेदवारांना देणार पाठींबा?

January 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! ई-पीक पाहणीसाठी उरले फक्त ‘इतके’ दिवस; ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीने नोंदणी कशी करायची?

January 12, 2026
मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

मोठी बातमी! सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार? पवार गट NDAमध्ये जाणार? ताईंनी थेट सांगितलं

January 10, 2026
Next Post
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेतील आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; नोंदणी-व्हेरिफिकेशनमध्ये चूक नको; 'या' तारखेपर्यंत शाळा नोंदणी करा पूर्ण...

ताज्या बातम्या

मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणूक खर्च बँकेमार्फत बंधनकारक नाही; कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

January 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेतील आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; नोंदणी-व्हेरिफिकेशनमध्ये चूक नको; ‘या’ तारखेपर्यंत शाळा नोंदणी करा पूर्ण…

January 12, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीचा पास विसरला, पप्पांना फोन करा, ते पैसे देतील अशी विनवणी; तरीही कंडक्टरने भर हायवे-वर चिमूरड्याला बसमधून उतरवले; तातडीने आमदार आवताडेंनी केली ‘ही’ मागणी

January 12, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! बापाने विहिरीत ढकलून जुळ्या मुलांचा घेतला जीव; सोलापूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना; पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

January 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कारभाऱ्यांनो आता चालणार नाही! केंद्र सरकारची ‘सरपंच पती’ प्रथेबाबत मोठी घोषणा; गाव पुढाऱ्यांना पंचायत राज मंत्रालयाचा दणका

January 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..