मंगळवेढा टाईम्स न्युज।
मित्रानेच मित्राचा विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात जितू परदेशी यांच्या मालिकेची खत व बियाणे विक्रीची दुकान असून दुकानाच्या गल्ल्यातून पैसे दररोज चोरले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सीसीटीव्ही पाहिल्यानंतर व्यापाऱ्याला धक्का बसला. ही चोरी व्यापाऱ्याच्या जवळच्या मित्राने केल्याचं समोर आलं. याप्रकरणी संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात जितू परदेशी यांच्या मालिकेची खत व बियाणे विक्रीची दुकान आहे. जितू परदेशी यांनी आपल्या दुकानात दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते.

गेल्या काही दिवसांपासून गल्ल्यातील रकमेतील फरक जाणवत असल्याने व्यापाऱ्याच्या मनात संशय निर्माण झाला. त्यांनी फुटेज तपासले असता त्यांना अक्षरशः धक्का बसला.

दुकानात नेहमी येणारा त्यांचाच मित्र अनिल शर्मा गल्ल्याजवळील खुर्चीवर बसून व्यापाऱ्याची नजर चुकवून हळूच गल्ल्यात हात घालतो आणि नोटा खिशात टाकतो, हे वारंवार दिसून आले.
सीसीटीव्ही फुटेजनुसार ही चोरी एक दिवसाची किंवा योगायोगाने झालेली नाही, तर ‘नियमित’ कृती असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हिडीओमध्ये चित्रित झाल्याप्रमाणे, अनिल शर्मा ठराविक वेळेला दुकानात येतो.

गल्ल्याजवळ आरामात बसतो, व्यापारी इतर कामात गुंग झाला की गल्ल्याकडे हात वळवतो, आणि सहजपणे गल्ल्यातील नोटा स्वतःच्या खिशात टाकतो. अतिविश्वास आणि जवळच्या नात्याचा गैरफायदा घेत केलेल्या या कृतीने व्यापाऱ्याला मानसिक धक्का बसला आहे.

सध्या हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणात जितू सुरेश परदेशी खांडबारा यांच्या फिर्यादीवरून अनिल रंजनलाल शर्मा खांडबारा यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











